जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
शनिवार दि:- १० मार्च,२०२४ निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मध्ये जुन्नर शाखा येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा ‘संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन’च्या वतीने रविवारी दिनांक १०/०३/२०२४ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ८० निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले.निरंकारी भक्तांबरोबर अनेक सज्जनांनीही या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वाय सी एम) रक्तपेढी,पिंपरी (पुणे) यांनी ८० युनिट रक्त संकलन करण्याचे कार्य केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री.चंद्रकांत कुऱ्हाडेजी (संयोजक, संत निरंकारी मिशन,आळेफाटा विभाग) समवेत श्री सुरेशभाऊ भोर (उद्योजक) यांचे शुभ हस्ते संपन्न झाले.यावेळी अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या शिबिरास सदिच्छा भेट देऊनमिशनच्या कार्याचे कौतुक केले आणि मिशनच्या सामाजिक योगदानासाठी शुभेच्छा दिल्या.संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे १९८६ मध्ये संत निरंकारी समागमा मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी निरंकारी बाबा हरदेव सिंहजीं महाराज यांनी मानवतेला संदेश दिला की “रक्त नाल्यांमध्ये नाही तर नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे”.संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश आज वर्तमान काळात निरंकारी ‘सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज’ यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे चालू ठेवला आहे.
वरील रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सेवादल आणि निरंकारी भक्तांचे योगदान लाभले.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार जुन्नर शाखेचे प्रमुख लक्ष्मण डाके यांनी मानले.