जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट रस्त्याचे मढ ते खुबी या ठिकाणी रखडलेले काम व रस्त्यावर पडलेला चिखल,खड्डे सुरळीत करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी खुबी येथे लक्षवेधी आंदोलन केले. महामार्गावर असलेल्या खड्ड्यावरती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भातलावगड करण्यात आली तसेच कार्यकर्त्यांच्यावतीने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांविरोधात निषेध करण्यात आला.येत्या चार-पाच दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करून रस्ता सुव्यवस्थित केला नाही तर मनसेच्या वतीने रस्ता बंद करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला.
नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे तसेच रस्त्यांवर आलेल्या राडा रोड्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. या रस्त्याचे काम सुरू असले तरी हे काम अगदी संथगतीने चालू आहे त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे,तानाजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.मढ ते खुबी हा रस्ता नेहमीच मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालकांमध्ये व प्रशासनामध्ये नेहमीच संघर्ष सुरू असून आता त्याने उग्र रूप धारण केले आहे.रस्त्याचे काम सुरू असले तरी वाद होत आहेत. अनेक ठिकाणी अपघात होऊन वाहनांना नुकसान होत असते. लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, असे निवेदन पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
गाण्यातून दिली साद ….रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांवर मनसे स्टाईलने भातलावणी करण्यात आली. दरम्यान, द्रोपदा शेळके या महिलेने ‘अरे वाटच्या वाटसरा,काय पाहतो डोंगराला,खड्डे पडले रस्त्याला कसा राडा रस्त्याला,एवढा निरोप जाऊन सांगा,संबंधित अधिकाऱ्याला,याव रस्ता दुरुस्तीला,’ असं गाणं म्हणण्यात आले.यावेळी खळखट्याक न करता अभिनव पद्धतीने आंदोलन झाले.त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे,सचिव विशाल डोके,जुबेर शेख,अनिल देशपांडे, दिनेश मुंढे,अनिल शिंदे,अनंता तळवडे,साईनाथ ढमढेरे,गणपत डुंबरे,दिलीप खिल्लारी, भुजबळ,गोरक्षनाथ रेपाळे,गणेश डोके, सरपंच दत्तात्रय डेंगळे खिल्लारी,नवनाथ वाळुंज, तान्हाजी तांबे,नंदकिशोर जगताप,रविराज चाळक,दीपक गुंजाळ,विजय कुचीक,सुशांत दिवटे,राम शिंदे, विकास मोरे, श्रीराम डोके,संपत खरडे,किरण डोके,संदेश खुडे,दिनेश बाणखेले,योगेश तोडकर,स्वप्नील भुजबळ,गणेश भालेराव,सुभाष जगताप,भूषण हांडे,किरण शेळके,चेतन जगताप,विक्रम चव्हाण,प्रवीण पवार,मच्छिंद्र जगताप,पंकज चव्हाण,विजय काठे,द्रोपदा शेळके,अशोक सुधीर तळवडे,मनोज चकवे,गोरक्षनाथ रेपाळे,उपस्थित होते.