शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.सदर निवडीनंतर अध्यक्ष राजाभाऊ मांढरे व उपाध्यक्ष नवनाथ शेठ सासवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतानी सांगितले आज पर्यंतच्या कार्याची दखल घेऊन वरिष्ठ नेत्यांनी जो आज पर्यंत आमच्यावरती विश्वास दाखवला तो सार्थ ठरवू व आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपा पक्ष संघटना मजबूत करू असे सांगितले.
अध्यक्ष राजाभाऊ मांढरे यांनी आजपर्यंत अनेक पदे भूषवली आहेत शिक्रापूर ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट चे ते अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत तसेच उपाध्यक्ष नवनाथ शेठ सासवडे शिक्रापूर व्यवसायिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत व शिक्रापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच पदी काम केले आहे व तंटामुक्ती अध्यक्ष हि होते.
तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते असे अनेक संस्थांवरती त्यांनी काम केलेले आहेअध्यक्ष व उपाध्यक्ष दोघांच्याही निवडीचेभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, शिक्रापूर व्यावसायिक असोसिएशन ,शिक्रापूर ग्रामपंचायत व शिक्रापूर मधील सर्व शैक्षणिक व सर्व सामाजिक क्षेत्रातील संस्था तसेच सर्व शिक्रापूर ग्रामस्थ यांच्यावतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.