शुभम वाकचौरे
जांबूत: ता-शिरूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट ) पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी राहुल जगताप यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याविषयी असलेली निष्ठा यामुळे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते जगताप यांना नियुक्तीपत्र पत्र देण्यात आले .राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून राहुल जगताप यांनी समाजकारण करावे यासाठी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय व धोरणे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जगताप हे प्रयत्न करणार असल्याचे यांनी सांगितले.
या निवडीबद्दल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, जांबुत ग्रामस्थ आदींनी त्यांचे अभिनंदन केले.