गोलेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने पुणे जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य रवि काळे यांचा सत्कार करण्यात आला.
गोलेगाव प्रतिनिधी ( चेतन पडवळ )
ता.१५ शिरूर तालुक्यातील निमोणे गावचे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पार्टीचे रवि बापू काळे यांची नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली. या निवडीबद्दल गोलेगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने रविंद्र काळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच निलेश बांदल.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेगाव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र कारंडे. माजी सैनिक सुरेश पडवळ.उद्योजक अजय वाखारे.शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक मच्छिंद्र गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. ..