जून्नर तालुका प्रतिनिधी रविंद्र भोर

शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या इसमाची ओतूर पोलिसांनी सुटका केली.समीर गजानन निवतकर वय: – ४०वर्षे, मुळ रा:- वेंगुर्ला जि:- सिंधुदूर्ग, सध्या रा:- कोथरूड पुणे असे सुटका केलेल्या इसमाचे नाव असून.

याप्रकरणी समीर निवतकर याने ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विश्वजीत महादेव ढोमसे रा:- ओझर ता:- जुन्नर याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

समीर गजानन निवतकर यांना ओझर येथील मोरया लॉजमधील रूम नं. १०४ मध्ये डांबून ठेवून या रूमला बाहेरून कुलूप लावण्यात आले असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना समजली.त्यांनी तात्काळ पो. हवा.नरेंद्र गोराणे,पो.ना.संदिप लांडे,पो.कॉ.संदिप भोते यांची टीम तयार करून या टिमला सदर ठिकाणी सुचना देवून पाठवले.लॉजमध्ये झाडाझडती घेतली असता समीर निवतकरला डामल्याचे दिसून आले. आरोपी विश्वजीत ढोमसे हा समीरला कोंडून पुण्याला गेला असल्याचे पोलीस पथकाला समजल्यानंतर पोलीसांनी समीर निवतकरची सुखरूप सुटका केली. समीर निवतकर यांनी विश्वजीत ढोमसे यांचे ११ लाख ५० हजार रूपये शेअर मार्केट मध्ये गुंतवून हे अकाउंट समीर स्वतः ऑपरेट करत होते. सुरूवातीस त्यांनी विश्वजित ढोमसे यास १ लाख ८० हजार रूपये नफा कमावून दिला.परंतू त्यांना समीर याच्यावर शंका आल्याने गुंतवणूक केलेले पैसे आताच्या आता मिळवून दे असे म्हणून २७ फेब्रुवारीला समीर यांना ओझर येथील लॉजमध्ये डांबून ठेवले होते.

पुढील तपास पो.हवा.आनंदा भवारी हे करत आहेत. सदर कारवाई ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे, पो.हवा.नरेंद्र गोराणे,पो.ना.संदिप लांडे,पो.कॉ.संदिप भोते यांनी केली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button