जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
डिसेंट फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असून,लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत तसेच महिला व दिव्यांग बांधवांसाठी मोलाचे कार्य करणारी ही एक अग्रगण्य संस्था आहे .त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, कृषी आणि आरोग्य विषयक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात.आणि म्हणूनच डिसेंट फाउंडेशन चे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी मढ येथील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
मढ, ता:-जुन्नर येथे डिसेंट फाउंडेशन पुणे,आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, हरिदास बाबा ज्येष्ठ नागरिक संघ मड, पारगाव, सितेवाडी, तळेरान व करंजाळे, आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मढ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ४५ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी नेण्यात आले. रुग्णांना ऑपरेशन दरम्यान प्रवास, निवास, जेवण व एक महिन्याची औषधे मोफत दिली जाणार असल्याचे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले.
याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, शिबिर समन्वयक प्रकाश पाटील,मढ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सरोक्ते मॅडम,माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ,डिसेंट फाऊंडेशनचे सचिव फकीर आतार,देवेंद्र खिलारी, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे,पांडुरंग मोढवे,सरपंच आदिनाथ चव्हाण,सरपंच अरुणाताई मस्करे,सरपंच विकास राऊत,बाजीराव मानकर, गणेश मेहेर,राजश्री कदम, प्रिया शिरसाठ,माळवे गुरुजी,भिसे गुरुजी अशा सेविका, नर्स इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत मस्करे, जी. के. लांडे, ताराचंद जगताप, जयराम मोजाड, बाळासाहेब चकवे आदींनी प्रयत्न केले.