प्रतिनिधी : सचिन थोरवे
मराठा समाजाला आरक्षण मेळावा यासाठी सगळे सोयरे याबाबत कायदा पारित करावा यासाठी मनोज दादा जरांगे पाटील बारा दिवसापासून अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि सगळे सोयरे याबाबतचा कायदा विशेष अधिवेशनात मंजूर करावा या महत्त्वाच्या मागणीसाठी जुन्नर तालुक्यातील हिवरे गावातील सुपुत्र दुर्गसंवर्धक राजेश उर्फ नाना भोर हे गेली बारा दिवस आपल्या जीवाची परवा न करता त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते अनेक जणांच्या आग्रही मागणीनंतरही त्यांनी उपोषण सोडण्यास स्पष्ट नकार दिला नकार दिला सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याच्या तीव्र भावना मराठा समाजाच्या वतीने अखंड महाराष्ट्रात उमटत असताना जुन्नर तालुक्यातही शिवजयंती वेळी परिणाम पाहायला मिळाला जरांगे पाटलांनी शिवजयंती उत्साहात साजरे करण्याचे आदेश दिल्यामुळे या ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले आणि शिवजयंती उत्साहात कुठे गालबट न लागता पार पडली
शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी बोलावले होते परंतु त्यात सगे सोयरे सोयरे हा कायदा पारित झाला नाही त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी जुन्नर तालुक्यातील हिवरे गावातील उपोषण करते राजेश भोर आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचा व्हिडिओ कॉल द्वारे मराठा सेवा संघाचे संदेश बारवे यांनी संवाद साधून दिला आणि राजेश भाऊ यांनी त्याला दुजोरा देऊन जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेलार विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर शिवसेना तालुकाप्रमुख माऊली शेठ खंडागळे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान चे डॉ श्रमिक सर गोजमगुंडे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडण्यात आले
उपोषण सोडत्यावेळी प्रथमता त्या ठिकाणी अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर शिव वंदना आणि आरती घेण्यात आली आपल्या मागण्या मान्य करावे यासाठी गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील देणार होते अनेक जणांनी भाषण करताना उपोषण करणाऱ्या राजाभाऊ ला ज्या आई-वडिलांना जन्म दिला त्यांना खरोखरच मानावे लागेल आई प्रमिला भोर यांनी इतकी साथ दिली की समाजासाठी उपोषण करत असताना तुझी किडनी खराब झाली तर माझी एक किडनी तुला देईल परंतु आता थांबायचं नाही एवढा विश्वास आईकडून मिळाल्यामुळे राजाभाऊ च्या अंगात दहा हत्तीचे बळ आईने निर्माण केले हा एक समाजापुढे आईचा आदर्शच आहे यावेळी पत्नी संगीता भोर यांनी माझ्या पतीला आपण एवढि साथ दिली अशीच साथ यापुढे आपण द्यावी अशी विनंती भोर ताई यांनी समाजाला केली यावेळी मुली काव्या भोर श्रवांतिका भोर देखील वडिलांचे उपोषण सोडण्यासाठी हजर होती राजेश भाऊ चे वडील सदा नाना भोर यांनी तर मुलगा समाजासाठी दिल्याचे जाहीरपणे सांगितले
राजेश यांना बारा दिवसाच्या उपोषण काळात अठरापगड जातीतील सर्व समाज बांधवांनी त्यांची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केल्याचे राजेश भाऊ यांनी सांगितले त्याचप्रमाणे त्यांची वैद्यकीय तपासणी सरकारी वैद्यकीय अधिकारी वर्षाताई गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खाजगी डॉक्टर शिंदे यांनी वेळोवेळी तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली सासऱ्याने देखील जावयाची काळजी घेतली.
आमदार अतुल शेठ बेनके यांना वडील माजीआमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके हे अनंतात विलीन झाल्याचं दुःख बाजूला सारून कार्यकर्त्यांसह राजेश भोर यांची भेट घेतली त्यांच्यासह नारायणगाव पोलीस स्टेशनचे सपोनी चंद्रकांत शेलार साहेब यांनी देखील त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त ठेवला होता उपोषणाची सांगता करताना त्या ठिकाणी पंचक्रोशीतील सर्व नागरिक उपस्थित होते त्यामध्ये हिवरे गावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच दिगंबर भोर त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गणेश शेठ महाबरे संदेश भाऊ बारवे शुभम थोरात अभी भोर सुरज भाऊ वाजगे विघ्नहर चे संचालक विकी काकडे यशराज काळे नारायणगाव या ठिकाणी साखळी उपोषण करणारे अनिल दादा गावडे योगेश तोडकर प्रमोद खांडगे विवेक भाऊ पापडे डॉक्टर प्रवीण शिंदे पवन शिंदे मंगेश भोर शुभम थोरात मनीष मार्केट अभी खैरे निखिल डोंगरे मधु नांगरे ओम खैरे ऋषी खोकराळे गणेश खोकराळे अमोल अमित भोर अमोल भोर संतोष भोर मनोज भोर शुभम भोर त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य मनीष मोरडे दयानंद मुळे अलका पाटील छाया खोकराळे अनिता थोरात योगिता खोकराळे अर्चना भोर पांडुरंग जाधव आणि पंचक्रोशीतील अनेक महिला लहान मुले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनिष मोरडेआणि दत्ता नाना भोर यांनी केले आणि सर्वांचे आभार विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी मानले