गुरुवर्य ग्रंथमित्र श्री.सोपानराव पवार सर,गुरुवर्य ग्रंथमित्र रमेशराव सुतार सर यांचे प्रमुख मार्गदर्शन..
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय ५८ वे वार्षिक अधिवेशन आळंदी देवाची पुणे येथे मंगळवार व बुधवार २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ व मा.अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते शिक्रापुर नगरीतील भुमीपुञ श्री.संतोष दशरथ काळे पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सन्मानचिन्ह व ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
श्री संतोष काळे हे शासनमान्य भैरवनाथ मोफत वाचनालय ग्रामपंचायत शिक्रापूर तालुका शिरूर ,जिल्हा पुणे येथे प्र.ग्रंथपाल या पदावर कार्यरत असून अल्पावधीत ग्रंथालय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची व सेवेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.ग्रंथालय क्षेत्रात गुरुवर्य ग्रंथमित्र सोपानराव पवार सर व गुरुवर्य ग्रंथमित्र श्री रमेशराव सुतार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याने अल्पवधीतच हा पुरस्कार मिळाला असल्याची भावना काळे यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री.विजय कोलते (अध्यक्ष पुणे विभाग ग्रंथालय संघ),ग्रंथमित्र श्री.सोपानराव पवार (पुणे विभाग ग्रंथालय संघ प्रमुख कार्यवाह ),ग्रंथमित्र श्री.रमेशराव सुतार कोषाध्यक्ष पुणे विभाग ग्रंथालय संघ ) मा.धोंडीबा सुतार गुरुजी ग्रंथमित्र व मां.अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रंथालय संघ) मा.मोहन शिंदे (अध्यक्ष पुणे जिल्हा ग्रंथालय संघ)मा. शालिनी इंगोले( सहा. ग्रंथालय संचालक पुणे), मा.श्रेया गोखले( जिल्हा ग्रंथालय अधिकारी पुणे) शांतीब्रह्म ह.भ.प. मारोतीबाबा महाराज कुऱ्हेकर , मा. दिलीपराव मोहिते पाटील( आमदार खेड आळंदी विधानसभा)मा. उल्हासदादा पवार (मा.आमदार), आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते , साहित्यिक, अधिकारी, पदाधिकारी, ग्रंथालय प्रतिनिधी , ग्रंथपाल उपस्थित होते.श्री संतोष काळे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन त्यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्काराने गौरव करून सन्मानित केल्याबद्दल त्यांचे शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.