हाक दिव्यांगाची…. साथ पंचायत समिती शिरुरची ” साहित्याची गरज व महत्त्व व तुमच्या जीवनातील समस्या यावर कशी मात करायची व समाजात वावरताना आपण समस्येवर मात करून आपले जीवन कसे सुखकर करायचे – महेश डोके (गटविकास अधिकारी शिरूर)
शिरूर प्रतिनिधी – एकनाथ थोरात
दिनांक – २० फेब्रुवारी रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पंचायत समिती शिरूर (समग्र शिक्षा) समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य साधनांचे वाटप फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.रांजणगाव गणपती यांच्या वतीने करण्यात आले तालुक्यातील २८ विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला महेश डोके गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरूर यांच्या हस्ते साहित्य साधने वाटप करण्यात आले .
कार्यक्रमामध्ये गटविकास अधिकारी यांनी विद्यार्थी व पालकांना मोलाचे असे मार्गदर्शन करून साहित्याची गरज व महत्त्व व तुमच्या जीवनातील समस्या यावर कशी मात करायची याबद्दल व समाजात वावरताना आपण समस्येवर मात करून आपले जीवन कसे सुखकर करायचे याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन करुन आपले मनोगत व्यक्त केले तसेच पंचायत समिती शिरूर चे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर व सर्व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने साहित्य साधने सर्व विद्यार्थी पालकांना सुपूर्द केले फियाट कंपनीच्या श्रीम.डॉ.सुनयना शिंदे वरिष्ठ मेडिकल ऑफिसर यांनीही विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले त्यांच्या समवेत सरवर शेख वरिष्ठ मॅनेजर तसेच सी.एस.आर.समन्वयक अमोल फटाले व इतर सर्व फियाट कंपनीचे सहकारी स्टाफ उपस्थित होता त्याच बरोबर ज्ञानदेव देवकाते जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण पुणे जिल्हा परिषद पुणे व विलास दरवडे जिल्हा समन्वय समावेशित शिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन सर्व समावेशित टिमचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप क्षीरसागर तालुका समन्वयक समावेशित शिक्षण यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन सर्व विशेष शिक्षक यांनी अगदी चोख बजावले शेवटी कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितीत पालक , विद्यार्थी व अधिकारी वर्ग यांचे आभार संदीप गोरडे तालुका समन्वयक समावेशित शिक्षण यांनी मानले व नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.