शिरूर येथील बाजार समिती याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवर व शिवभक्त….
गोलेगाव प्रतिनिधी – (चेतन पडवळ)
ता.२० गोलेगाव याठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
ता.१८ रोजी सायंकाळी ७ वाजता गोलेगाव येथील शिवभक्तांनी किल्ला शिवनेरीकडे शिवज्योत घेऊन प्रस्थान केले.ता.१९ सकाळी १० शिरूर बाजार समिती येथील प्रारगंणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी सरपंच दिलीप पडवळ सोसायटी माजी चेअरमन संतोष वर्पे.एकनाथ वाखारे यांनी पुजन केले. “जय भवानी जय शिवाजी” अशी गर्जना करत गोलेगावकडे पायी शिवज्योत शिवभक्त घेऊन निघाले.गोलेगावचे पोलीस पाटील संदिप भोगावडे यांच्या वतीने अल्पहार देण्यात आला. गोलेगावमध्ये शिवज्योतीचे आगमन झाले.यावेळी शिवज्योतीचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.सायंकाळी ५ वाजता गावठाण परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.
पुणे येथील नेव्हील वाडिया इन्स्टिट्यूट महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.वृषाली रणधीर यांनी ” मी सावित्रीबाई फुले बोलतेय ” एकपात्री नाटीका सादर केली. ह.भ.प सचिन महाराज आनंदें यांचे शिव व्याख्यान झाले. यावेळी पुणे येथील बेलबाग संस्थान यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी बद्दल हिंगोलीचे पोलीस उपअधीक्षक अनिल कटके.आदर्श शिक्षक संदिप आढाव.शरद दुर्गे .संदिप घावटे..विशाल वाखारे.व ठाणे याठिकाणी कार्यरत असणारे पोलीस खात्यातील नितिन चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास पुणे वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य वृषाली रणधीर. माजी सैनिक बी.जी.पाचर्णे सरपंच सुनिता वाखारे उपसरपंच निलेश बांदल.माजी उपसरपंच सुनील पडवळ.तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग बांदल.व कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळाचे सदस्य ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोलेगाव येथील उद्योजक गणेश महाजन यांच्या वतीने भोजन तर पत्रकार चेतन पडवळ यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळ. समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.