शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील घोडगंगेच्या तीरावर वसलेल्या सुंदर पवित्र आदर्श गाव शिंदोडी येथे विविध आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारे वर्ष ३४ वे या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात पार पडला. १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संगीतमय कथेचे आयोजन वारकरी सांप्रदाय मंडळ, व ग्रामस्थ शिंदोडी यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी दररोज पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, नामस्मरण, महिला भजन, प्रवचन, सायंकाळी सामुदायिक हरिपाठ ,महाआरती आदी कार्यक्रम घेण्यात आले. २० फेब्रुवारी रोजी संपूर्ण शिंदोडी गावातून भव्य ग्राम प्रदक्षिणा पालखी सोहळा व त्यानंतर दि.२१ रोजी सकाळी.१० ते १२ या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प महंत शांतिगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद मा. आदर्श सरपंच, बहुजनांचे नेते माननीय. दौलतनाना शितोळे जय मल्हार क्रांती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या तर्फे देण्यात आलायावेळी या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.तसेच महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.