प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे मल्लिकार्जून विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाहिद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या इयत्ता दहावीच्या शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य शेख यांनी शालांत जीवनातील बोर्डाची ही तुमची पहिलीच परीक्षा असून पुढे तुम्हाला अनेक परीक्षेस सामोरे जायचे आहे.त्यासाठी न घाबरता तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे जा असे आवाहन केले आणि विद्यालयामध्ये राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना एस.एस.सी.परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक भाषणामध्ये विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतअनेक उपक्रम राबवत असलेली माहिती सांगितली.प्रा.एन.बी.मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात आरोग्याची काळजी घ्या असा सल्ला देऊन या विद्यालयाशी असलेल्या जून्या नात्यांच्या आठवणी सांगितल्या.
या कार्यक्रमासाठी अनेकांनी विद्यार्थी मनोगतात शिक्षकांबद्दल आणि शाळेविषयी आदराची भावना व्यक्त केली.मल्लिकार्जून विद्यालयाचे प्रा.जे.डी.जाधव,प्रा.आर .डी.जगताप, वरिष्ठ लेखनिक पी.ए.इंगळे,अंबादास गावडे,उपप्राचार्य संभाजी कुटे, संतोष शेळके ,दिलीप वाळके,नवनाथ डुबे, देविदास कंठाळे, ज्योती गजरे सुप्रिया काळभोर, सत्यश्री दिवटे ,शरद शेलार, मच्छिंद्र बेनके, बाबुराव मगर ,लक्ष्मण हरीहर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष हिंगे यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले.