जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२४ या परीक्षेत यश मिळवल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.आयआयटीसह इतर इंजिनीअरिंग संस्थांमधील प्रवेशासाठी देशपातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीए तर्फे घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेच्या पहिल्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने जाहीर केलेल्या माहितीनुसार,नोंदणीकृत उमेदवारांपैकी ९५.८ टक्के उमेदवार जेईई मेन २०२४ परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षातील पहिल्या सत्रासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या इ.१२ वी मध्ये शिकत असलेल्या सृष्टी भाकरे ८१.१४ पर्सेंटाईल गुण,प्रणव कणसे ७९.६१ पर्सेंटाईल गुण,तर वर्षा लामखडे हिने ७३.१५ पर्सेंटाईल गुण मिळवले. त्याचप्रमाणे बहुतांशी विद्यार्थ्यांना ६० पर्सेंटाईल वर गुण मिळविल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा.राजेंद्र नवले,प्रा.संतोष पोटे,प्रा.अमोल खामकर,प्रा.विनोद चौधरी,प्रा.नूतन पोखरकर,प्रा.रोहिणी औटी,प्रा.सोनल बांगर,प्रा.शुभांगी सोळसे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,क्रीडा संचालक एच पी नरसुडे तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.