प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे दि१३ फेब्रुवारी रोजी इ १२ वीचा शुभेच्छा समारंभ कार्यक्रमात चां. ता. बोरा महाविद्यालयाचे प्रा.दत्तात्रय बोबडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात अभ्यासाबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी सकस आहार घेणे,रात्रीचे जागरण न करणे,ताणतणाव न घेता परीक्षेस सामोरे जाणे या बाबी विद्यार्थ्यांना सांगून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास शिरुर-हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.
यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितके महत्त्व देतात तितकेच महत्त्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिले पाहिजे,विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वतःचे तसेच शाळेचे नाव उज्वल करावे.असे मत व्यक्त केले.तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे अनेक प्रश्न विचारून चकीत केले,विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रश्नाची अचूक उत्तरे दिली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब बनके होते.प्रा.सुनील निंबाळकर ,प्रा.सुनिल कायंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके यांनी केले.त्यांनी प्रास्ताविकेत विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असून विद्यालयात अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहे.इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे व्यवस्थापक अनिकेत बेनके,प्राध्यापक संतोष शेळके,नवनाथ दुबे,सतीश अवचिते,सुप्रिया काळभो,विद्या शेंडगे,यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी उपप्राचार्य संभाजी कुटे,संस्थेचे सचिव मनोहर भोसले, खजिनदार पोपटराव वाघचौरे, सुभाष भोसले,बाळकृष्ण वाघचौरे,जोगा जांभळकर,रामदास वाघचौरे,राजेंन्द्र गुळवे,रविंन्द्र मखर,तुकाराम मोरे,वैभव शिंदे,पांडुरंग वेताळ,हेमंत दरडा,दिलीप वाळके , संतोष हिंगे ,अंबादास गावडे ,देविदास कंठाळे ,ज्योती गजरे ,सत्यश्री दिवटे ,बाबूराव मगर, मच्छिंद्र बेनके,शरद शेलार,लक्ष्मण हरीहर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष शेळके यांनी केले व आभार प्रदर्शन श्री नितीन गरुड सर यांनी मानले.