प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
जीवनात येणाऱ्या परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री भैरवनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाबळ ता.शिरूर जि.पुणे आयोजित इ.१० व इ. १२ वी विद्यार्थी निरोप समारंभ व अण्णासाहेब महादेव ओहोळ यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने लडकत यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपानराव जाधव होते. कार्यक्रमाला मिलिंद एकबोटे, उपाध्यक्ष कुमार बगाटे, सचिव पांडुरंग लोखंडे,खजिनदार गोरक्ष गावडे,संचालक कल्पेश थोरवे, धनाजी जाधव पाटील, महेश शिनलकर, सागर आगरकर , मंगेश पिंगळे, प्राचार्य अविनाश क्षीरसागर, प्राचार्य डॉ.संजय घोडेकर, उपप्राचार्य सुदाम पिंगळे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे उपस्थित होते.
लडकत पुढे म्हणाले की आपल्या देशाला आदर्शवत लोकांची महान परंपरा आहे या परंपरेचा लौकिक डोळ्यासमोर ठेवून इच्छित ध्येय महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी साध्य करणे गरजेचे आहे. यावेळी अण्णासाहेब ओहोळ यांच्या ३२ वर्षाच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. ओहोळ कुटुंबीयांनी प्रशालेतील तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुग्रास भोजन दिले. कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांचा परिचय प्रा. जितेंद्रकुमार थिटे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथराव बगाटे,संतोष क्षीरसागर यांनी तर आभार एकनाथ शिवेकर यांनी मानले.