जुन्नर तालुका प्रतिनिधी
ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय,उदापुर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची पालकसभा सोमवार १२ फेब्रुवारी रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी या विद्यार्थ्यांना “”परीक्षेला जाता, जाता”” या विषयावर घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी इयत्ता १० वी च्या मुला -मुलींना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आपल्या मनाची अमर्याद शक्ती ओळखावी कारण तीच आत्मशक्ती एक मार्च पासून सुरू होणाऱ्या बोर्ड परीक्षेत तुम्हाला उपयोगी ठरणार आहे.कारण माइंड ऑफ पॉवर जर सशक्त असेल तर आपल्या मनाची संकटांना सामोरे जाण्याची तयारी असते.दहावी इयत्तेत मिळालेले गुणच पुढे आपले करियर निवडण्यात सुलभता आणते.आपण यावर्षी चाचणी, सहामाही परीक्षा व सराव परीक्षा दिलेल्या आहेत त्यात काही पास तर काही नापास झालेअसाल मात्र राहिलेल्या दिवसात योग्य नियोजन केल्यास तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
अमर्याद शक्ति व तणाव मुक्ती या या सूत्राचा समन्वय साधताना मनुष्याच्या सकारात्मक बुद्धीच्या विचारांत प्रचंड ताकद आहे याची अनुभूती तुम्ही स्वतः अनुभवून पहा दैनंदिन जीवनातील व्यायाम,आहार व एकग्रता या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे आई वडिलांच्या कष्टाला तुम्ही यातूनच न्याय देऊ शकता.यावेळी मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की यासहविचार सभेच्या माध्यमातून तुम्हाला ही अंतिम फवारणी करण्यात येत असून तुम्हीयातून योग्य धडा घेऊन यशस्वी होऊ शकता. यावेळी याच विद्यालयातील माजी उपमुख्याध्यापक व इंग्रजी भाषा शिक्षक संजय ढमढेरेयांनी मुलांना मार्गदर्शन केले व सहशिक्षक योगेश गाढवे यांनी परीक्षा योग्य नियोजन करण्यात आले असून सर्व नियम व अटी मुलांना समजावूनसांगितल्या यावेळी दशरथ भाईक,लतीफ मोमीन तसेच महिला पालक व पुरुष पालक आणि इयत्ता १०वी चे ८५ विद्यार्थी उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचालन व प्रास्तविक साईनाथ भोर यांनी तर दशरथ भाईक यांनी आभार मानले.