प्रतिनिधी : मारुती पळसकर
चांडोह ( ता. शिरूर ) येथील नेहमीच वर्दळीचा असणारा चांडोह ते पिंपरखेड भुजबळ वस्ती रस्ता डांबरीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला असून या होणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन दि.१५ रोजी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
चांडोह येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर निधीची उपलब्धता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रयत्नाने करून देण्यात आली आहे.या निधीच्या वापरातून नेहमीच वर्दळीत असणारा भुजबळ वस्ती रस्ता ११३ मीटर डांबरीकरण होणार असल्याने नजीकच्या ग्रामस्थांनी तसेच तेथून जाणाऱ्या नियमित प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.उर्वरित राहिलेल्या रस्त्याचे पण डांबरीकरण लवकरात लवकर व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे,तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संपतराव पानमंद,सरपंच वंदना पानमंद,उपसरपंच रामभाऊ येवले,माजी सरपंच केशव कोंडे,माजी उपसरपंच सतीश गोडसे,ग्रामपंचायत सदस्य मनीषा भाकरे,तंटामुक्ती अध्यक्ष संपत वळसे,उपाध्यक्ष तुकाराम भुजबळ,चेअरमन बाळासाहेब टाव्हरे,व्हाईस चेअरमन नामदेव शिंदे,पोलीस पाटील सुदर्शन भाकरे,सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ शेलार,कैलास सालकर, वसंत भुजबळ,जगन्नाथ भाकरे,हर्षल भुजबळ,पोपट भुजबळ,दादाभाऊ पानमंद,सुनील भुजबळ,तुकाराम भुजबळ,तुळशीराम भाकरे,अमोल भोर,विशाल पानमंद,अशोक भाकरे,मच्छिंद्र भाकरे,रखमा शेलार,संजय भुजबळ,सेवानिवृत्त वन कर्मचारी विठ्ठल भुजबळ,सखाराम गोडसे,प्रदीप भुजबळ,अमित भाकरे,कॉन्ट्रॅक्टर राजू दाभाडे,योगेश हिलाल,बंडू कांदळकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.