जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय उदापुर येथील इयत्ता १० च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी दिली.
१० फेब्रुवारी हा दिवस २०१५ पासून जंतनाशक दिवस म्हणून पाळला जातो.त्या दृष्टीने सर्वअंगणवाडी, शाळांमध्ये १० फेब्रुवारीला मुलांचे जंत निर्मूलनाचे अभियान राबवण्यात येत आहे.त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिकशाळा व माध्यमिक शाळेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उदापुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश केंगार यांनी आशा वर्कर घोडेकर यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जंतनाशक गोळ्या उपलब्ध करून देत पालकांमध्ये जनजागृती केली.
मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी याबाबत मार्गदर्शन करताना मुलांना जंत संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची,एक मार्च पासून इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू होणार असल्याने मुलांच्या पोषणासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक गोष्टी याबाबत माहिती दिली. प्रत्येक पालकांनी या बाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.सहशिक्षक योगेश गाढवे आणि सहशिक्षिका यांनी वैयक्तिक स्वच्छता या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.