जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नरहून मुंबईला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग ठरणाऱ्या दाऱ्याघाट प्रकल्पाबद्दल मुख्यमंत्री सतत बोलत असतात तो विषय आपण मार्गी लावणार आहोत,तसेच जुन्नर मधील आदिवासी बांधवांच्या ज्या -ज्या मागण्या आहेत.त्या-त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिले.जुन्नर तालुक्या- तील निरगुडे पाडळी जिल्हा परिषद गटात शिवसेना मेळावा पार पडला.यावेळी खासदार शिंदे बोलत होते.
या मेळाव्यात शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील,माजी आमदार शरद सोनवणे,शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख अरुण गिरे,युवासेना सचिन बांगर,उपतालुका प्रमुख दत्ताभाऊ गवारी, महिलाआघाडी उपतालुका प्रमुख सुनीता बोऱ्हाडे, जुन्नर तालुका युवा सेना प्रमुख विकास राऊत,संदीप डोळस,बबन वाळकोळी,गणेश कोल्हाळ,जालिंदर साबळे,प्रियांका शेळके,अशोक बोचरे,जुन्नर शहर प्रमुख अविनाश कर्डिले,दर्शन फुलपगार,दिपेश परदेशी,काशिनाथ साबळे,जेष्ठ शिवसैनिक रमेश जेजुरकर,दशरथ आहेर,दशरथ मंडलीक आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी माजी आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी भागातील अनेक मागण्यांमध्ये देवळे वअंजनावळे या भागामधील ढाकरहोळ तलाव, माणिकडोह धरणातील पोटबंधारे,तसेच सुकाळवेढे,आंबे, हातवीज,हिवरे तर्फे मिन्हेर या गावांना शेती व पिण्यासाठी डिंभे धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी,आदिवासी भागात पर्यटन वाढीसाठी सुकाळवेढे येथील वरसूबाई मंदिर परिसरात आदिवासी संस्कार सृष्टी,आदिवासी भागातील पर्यटन स्थळांचा विकास, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे गुरु लहू बोऱ्हाडे यांचे देवळे गावात स्मारक, सुकाळवेढे – बोरघर घाट मार्गे व खेतेपठार – बुचकेवाडी मार्गे जुन्नर आणि आंबेगावला जोडणारे रस्ते या रस्त्यांसाठी तत्काळ प्रत्येकी १० कोटी रुपये निधी, गाव तिथे महिला अस्मिता भवन, मणिकडोह धरणाला माजी आमदार कै.कृष्णराव मुंढे यांचे नाव अशा विविध मागण्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समोर मांडल्या.
स्वागत सुनीता बोऱ्हाडे यांनी केले.सूत्रसंचालन अशोक बोचरे तर प्रास्ताविक दत्ता गवारी यांनी केले व आभार विठ्ठल बोऱ्हाडे यांनी मानले.