जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
आलमे गावच्या सरपंच शितल देवेंद्र फोडसे, ग्रामपंचायत आलमे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांची सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात आली आहे.सरपंच शितल देवेंद्र फोडसे यांनी २०२१ मध्ये सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यावर सर्वप्रथम आलमे गाव टँकर मुक्त करण्यासाठी गावातील लोकांची पिण्याच्या पाण्याची कायम स्वरूपी सोय व्हावी यासाठी गावात पाण्याचा शास्वत स्रोत नसतानाही गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागावा यासाठी पिंपळगाव जोगे ते आलमे पिण्याच्या पाण्याची 4 कोटीची पाईप लाईन मंजूर करुण घेतली.
यासाठी गावातील सर्वांना एकत्र घेऊन गावातून ९लाख रुपये निधी गोळा करून पुष्पावती नदीच्या तिरी विहरिसाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच तीन वर्षाच्या काळात सरपंच शितल फोडसे यांनी विविध योजनांमधून गावासाठी जवजवळ ७ कोटीं रुपयांची कामे गावात केली.गावातील सर्व महिलांना एकत्र करून बचत गटांची स्थापना करून याद्वारे महिलांना विविध योजनांचा फायदा मिळुन देण्याचे काम ग्रामसंघाच्या माध्यमातुन त्या करत आहेत. कोरोना काळात देखीलअतिशय उल्लेखनीय कामगिरी केली तसेच यापूर्वीही सरपंच शितल फोडसे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना झी २४ तास या वाहिनीवर चर्चासत्रात सहभागी करण्यात आले होते. या सर्व कामांची दखल घेऊन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२४ सरपंच शितल देवेंद्र फोडसे यांना जाहीर करण्यात आला आहे.