(अठरा विद्यार्थ्यांना “ए” ग्रेड)
जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयाचा शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.दरवर्षी शासकीय चित्रकला परीक्षेच्या माध्यमातून विद्यालया,- तील विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेला बसतात.यावर्षी इंटरमिजिएट परीक्षेला १४३ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १२ विद्यार्थ्यांना एक ग्रेड तर ४२ विद्यार्थ्यांना बी ग्रेड आणि इतर विद्यार्थ्यांना सी ग्रेड मिळाली आहे. एलिमेंट्री परीक्षेत १०१ विद्यार्थी बसले होते. सहा विद्यार्थ्यांना ए ग्रेड ,४० विद्यार्थ्यांना बी ग्रेड आणि उरलेल्या विद्यार्थ्यांना सी ग्रेड प्राप्त झाली आहे.या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला विभाग प्रमुख संतोष सोनवणे व बाळासाहेब साबळे यांनी मार्गदर्शन केले. १९७० सालापासून चैतन्य विद्यालयात या शासकीय परीक्षेचे केंद्र आहे.
:–ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी (इंटरमिजिएट)–: १) दीप्ती निलेश डुंबरे २) श्रावणी यादव गायकर ३) श्रीकृष्ण राजेंद्र फलके ४) ज्ञानेश्वरी रवींद्र शिंगोटे ५) अवधूत प्रतीक अकोलकर ६) वेदिका लहू भालेराव ७) पूर्वा गणेश ढमाले ८) समृद्धी दत्तात्रेय डुंबरे ९) आर्या सुनील हांडे १०) श्रुती मंगेश कोंडार ११) समिधा गणेश मोर १२) सार्थक मंगेश तांबे.
:– ए ग्रेड प्राप्त विद्यार्थी (इलेमेंटरी)–:१) संस्कृती दीपक अहिनवे २)मंतशा इलियास मोमीन३) तन्वी सुनील पंडोरे ४) शर्वरी संतोष सोनवणे ४) भाग्यश्री मंगेश सुर्वे ६) महेक इस्माईल इनामदार या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे प्रभाकर तांबे राजेंद्र डुंबरे रघुनाथ तांबे प्रदीप गाढवे पंकज घोलप आदींनी अभिनंदन केले आहे.