जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्य स्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार डिंगोरे ता:- जुन्नर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा रमेश सोनवणे यांना जाहीर झाला आहे,अशी माहिती संघाचेसंस्थापक बाबासाहेब पावसे व प्रदेशाध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.
ग्रामीण भागाच्या विकासाचा ध्यास घेवून सरपंच सीमा सोनवणे यांनी गावचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने डिंगोरे गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळविला.आपल्या याकार्याची दखल घेवून स्वराज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने राज्यस्तरीय राज्य आदर्श सरपंच पुरस्कार २०२४ जाहीर करत असल्याचे पावसे व पवार यांनी सांगितले
डिंगोरे गावात विविध विकास कामे करत असताना सरपंच सीमा सोनवणे यांना माजी जिल्हा परिषद सदस्य व नियोजन समिती सदस्य अंकुश आमले यांचे तसेच गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामपंचायत उपसरपंच व सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. अशा पुरस्काराने प्रेरणा मिळाली असून पुढील काळात अधिकाधिक गावचा विकसित करण्यासाठी प्रयत्नकरणार आहे.