प्रतिनिधी : मारुती पळसकर
राज्याच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत चांडोह ( ता.शिरूर ) येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या बापूसाहेब गावडे माध्यमिक विद्यालय चांडोह या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून ४ विद्यार्थी बी श्रेणी मध्ये व १३ विद्यार्थी सी श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे. शासकीय रेखाकला परीक्षेत मिळालेल्या श्रेणीमुळे विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांमध्ये वाढ होत असून,पुढील उच्च शिक्षणामध्ये मिळणाऱ्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी ती उपयुक्त ठरणार आहे.’’त्यामुळे या परीक्षेचे महत्त्व वाढलेले असून जिल्हा आणि राज्यस्तरावर परिक्षेचे आयोजन केले जाते.रेखाकला परीक्षेमध्ये गावडे विद्यालयाचे १७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यामध्ये बी श्रेणी मधून तन्वी संतोष वडणे,सुजल कैलास झिंजाड,संकेत शरद पवार,सुराज्य सतिश गोडसे,सी श्रेणी मध्ये शेजल दादाभाऊ पानमंद,शिवांजली भरत वडणे,पूर्वा दिनकर भाकरे,साक्षी संजय जाधव,वैष्णवी शामकांत उबाळे,सिध्देश मल्हारी भाकरे, साहिल सुनिल भाकरे,सुयश वसंत भुजबळ,आर्यन रमेश चापुडे,आदित्य संजय सालकर,तेजस पांडूरंग शेलार,सार्थक बाळू सरोदे, ओंकार नाथा शिंदे असे सर्व १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक नवनाथ राऊत,संभाजी खोडदे यांनी मार्गदर्शन केले असून सर्वांचे संस्था अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे,सचिव जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे,सहसचिव राष्टवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, मुख्याध्यापक विलास घोडे,तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक संपतराव पानमंद,सरपंच वंदना पानमंद, उपसरपंच रामभाऊ येवले,माजी उपसरपंच सतिष गोडसे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय गोडसे,उपाध्यक्ष पोपट भुजबळ,माजी सरपंच कल्याणी वडणे,कुसुम शेलार,चेअरमन बाळासाहेब टाव्हरे,व्हाईस चेअरमन गोटीराम चिखले,माजी उपसरपंच कचर पानमंद,संजय चिखले,पोलीस पाटील सुदर्शन भाकरे,बाळासाहेब सालकर,बाळासाहेब वडणे,पांडुरंग सालकर,रा. कॉ.सरचिटणीस देविदास शिंदे,मारुती वडणे,शांताराम पानमंद,राजेंद्र ढगे,दत्ता पानमंद,भाऊसाहेब पानमंद,विलास सरोदे,सुभाष शेलार,विशाल शिंदे,हर्षल भुजबळ यांसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.