प्रतिनिधी : सचिन थोरवे
जुन्नर तालुक्यातील आर्वी गावातील शिवनेर विद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक मान्यवर यांनी कार्यक्रमाचे वेळी उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार हे देखील ग्रामस्थांच्या निमंत्रणाला मान देऊन त्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते
शेलार साहेब यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद शाळेतील मुलांमध्ये शारीरिक फिटनेस स्टेज डेरिंग असल्यामुळे हीच मुले पुढे 80 ते 90 टक्के एमपीएससी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होतात कारण या मुलांचा सर्वांगीण विकास झालेल्या असल्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात व ते यशस्वी होतात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मीही स्वतः एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी असल्याचेही त्यांनी सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक थोरात सर हे होते ग्रामस्थ म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद डोंगरे उपाध्यक्ष अर्चना अर्चनाताई गाढवे सामाजिक कार्यकर्ते जयेश भाऊ खांडगे त्याचप्रमाणे गणेश दिवेकर मनू अण्णा गावडे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण गाढवे त्याचप्रमाणे पोलीस पाटील खुडे हे उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी थोरात मॅडम तोडकर सर घाडगे सर पिंगट सर गरकळ सर ठाणगे मॅडम घोडेकर मॅडम घायवट सर कुमकर सर यांनी परिश्रम घेतले.