शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
द युवा ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य शिरूर तालुका आयोजित मराठी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन व द युवा ग्रामीण पञकार संघ शिरूर तालुका पद नियुक्तीपञ व ओळखपञ वाटप कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय शिरूर या ठिकाणी केल्याची माहिती तालुकाध्यक्ष शकील मणियार यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रम हा द युवा ग्रामीण संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन मराठी दिनदर्शिकेचे प्रकाशन व पद नियुक्तीपञ व ओळखपञ वाटप आज तक न्युज चँनेलचे पुणे/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी व द युवा ग्रामीण पञकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रदेश अध्यक्ष रोहित वाळके साहेब,शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप यादव साहेब तसेच सामाजिक कार्यकर्त्या वृषालीताई विशालशेठ घायतडक आदिंच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी द युवा ग्रामीण पञकार संघाचे महराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शामभाऊ कांबळे,वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तात्यासाहेब सोवनणे,मा.आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे,कॉंग्रेस कमिटिचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव (तात्या) यादव,निमोणे गावचे विद्यमान सरपंच संजय (आबा) काळे,शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे,द युवा ग्रामीण पञकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान,शालेय व्यवस्थापन समिती निर्वी अध्यक्ष प्रदिप साळुंके,सामाजिक कार्यकर्ते हाजी सादिकभाई बागवान,युवा उद्योजक बंटीशेठ घायतडक,श्रीपाद उद्योग समुहाचे अध्यक्ष कमलेश बुराडे,आदि.मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पाडण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पञकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आव्हान द युवा ग्रामीण पञकार संघ शिरूर तालुका यांनी केले आहे.