जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जेष्ठ साहित्यिक स्व.डॉ.अनिल अवचट यांचा द्वितीय पुण्यस्मरण निमित्त स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान ओतूर यांचावतीने डॉ.अनिल अवचट लिखित पुस्तक श्री गाडगे महाराज विद्यालय,चैतन्य विद्यालय,अण्णासाहेब वाघिरे महविद्यालय ओतूर, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय,जेष्ठ नागरिक संघ कार्यालय,ग्रामपंचायत वाचनालय ओतूर या ठिकाणचा ग्रंथालयास भेट देण्यात आले.या कार्यक्रमास रमेश डुबरे,पोपट नलावडे,सरपंच डॉ.छायाताई तांबे,नितीन पाटील,प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे,मुख्याध्यापक डी.व्ही. पानसरे,मिटकरी,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर,सुदाम ढमाले,भिवा माळवे.प्रतिष्ठानचे सदस्य मेघनाताई देशमुख,वैशाली घाटगे,संजय घाटगे ,रोहिदास डुंबरे,सुशील हिगणे, विकास चव्हाण,विष्णू काळे तसेंच सर्व शाळाचे विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा हस्ते डॉ अनिल अवचट यांचा प्रतिमेच पूजन करण्यात आल.रमेश डुंबरे,पोपट नलावडे,कु.तनिष्का खेत्री,बी.आर.खाडे यांनी जेष्ठ साहित्यिक,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त समाजसेवक डॉ अनिल अवचट यांचा कार्यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी बोलताना रमेश डुंबरे म्हणाले,आजचा आधुनिक युगात जागतिकीकरण अत्यंत वेगाने होत आहे.इंटरनेटचा माध्यमातून संपूर्ण जग अगदी हातामध्ये आले असले तरी”खरी ऊर्जा,शक्ती,आणी विचार देण्याची ताकद फक्त पुस्तकामध्ये आहे”
पुस्तक वाचण्याचा छद माणसाला आनंद व मानसिक समाधान देते.पुस्तक वाचल्याने मानसिक आरोग्य,तसेंच चांगले आरोग्य लाभते.वाचनाने आपली एकाग्रता व वैचारिक शक्ती देखील वाढते.वाचलेल मस्तक कधी कुणापुढे नतमस्तक होत नसत असे त्यांनी सांगितले.भविष्यात तुमच्यातील एक विद्यार्थी डॉ अनिल अवचट यांच्यापासून प्रेरणा घेऊन थोर साहित्यिक होवा ही इच्छा त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून, भविष्यात अजून देखील काही पुस्तक हवी असल्यास ती देखील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी विध्यार्थ्याना दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा तांबे,भिवा माळवे गुरुजी यांनी केले.तसेंच आभार प्रदर्शन रवींद्र अहिनवे यांनी केले.