प्रतिनिधी : मारुती पळसकर
शिरूर तालुक्यातील शाळा,महाविद्यालये,शासकीय , निमशासकीय कार्यालये,सहकारी संस्था आदि ठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वडनेर खुर्द (ता.शिरूर) येथे असणाऱ्या कै.किसनराव राऊत सार्वजनिक वाचनालयाकडून शिरूरच्या बेट भागातील शाळांमधून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
टाकळी हाजी,जांबूत केंद्रातील तब्बल ३२ प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांचे लेखन कौशल्य वृद्धिंगत व्हावे म्हणून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात बेट भागातील वडनेर खुर्द,ज्ञानेश्वर नगर,शरदवाडी,जोरीलवण,जांबुत,गाजरेझाप,पिंपरखेड,कोयमहाले वस्ती,दाभाडे मळा,ढोमे मळा,काठापूर,चांडोह,फाकटे, पिरसाहेब नगर,साबळे वाडी,उचाळे वस्ती,टाकळी हाजी,एस.पी.नगर,टेमकर वस्ती,सोदक वस्ती,तामखरवाडी,शिवनगर,डोंगरगण,संगमवाडी,म्हसे बुद्रुक,शिनगरवाडी,मांडव ओहोळ,होनेवाडी,घोडे वस्ती,भैरवनाथ वाडी,माळवाडी, दुडेवस्ती आदि शाळा व भाग शाळांमध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.कै.किसनराव राऊत वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ किसन राऊत,उपाध्यक्ष श्रीकांत निचित,कार्यवाह डी.एम.निचित,संचालक पांडुरंग निचित,अर्जुन निचित,संपत पवार,नाथा निचित,राजेंद्र उंडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होताना पहावयास मिळत आहे.
प्रत्येक शाळेला उपक्रमशील शाळा म्हणून आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
उपक्रम यशस्वी होण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष संचालक मंडळ यांसह रतन निचित,बाळासाहेब घोडे,संदीप दरेकर,अक्षय निचित,दिलीप बोचरे,अनिल सूक्रे,अरुण राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.