जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

परंपरागत चालीरितींना फाटा देत नारायणगाव येथील जुन्नर तालुका राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिलांनी मकर संक्रांतीनिमित्त एकत्र येऊन हळदी- कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. सध्याचे जीवन हे धावपळ आणि कामाच्या व्यापामुळे सर्वांचे व्यस्त झाले असून,ही बाब लक्षात घेऊन घरोघरी जाऊन हळदी- कुंकवाचा कार्यक्रम आयोजित न करता एकाच ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय तालुक्यातील महिलांनी व नारायणगाव परिसरातील महिलांनी घेतला.त्यानुसार नारायणगाव शहरातील संत सेना महाराज मंदिर येथे समाजातील जुन्या सर्व चालीरितींना फाटा देत हळदी – कुंकवाचा कार्यक्र शुक्रवारी दि:- १९ जानेवारी रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्व महिलांनी एकमेकांना हळदी-कुंकू, वाण देण्यासह व सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण केली आणि यानिमित्ताने एकमेकांना तिळगूळ देऊन उपस्थित महिलांना पैठणी वाटप करण्यात आले .यावेळी नवीन पायंडा पाडला की,दरवर्षी पुन्हा एकत्र येऊन हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे संयोजक महिलांन सागितले.

राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित आलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके,तसेच राजश्री बोरकर पोर्णिमा भोर,अनिता जाधव,विद्या मदने, अनिता रायकर,वंदना वाघचौरे,सुरेखा जाधव,नामदेव नायकोडी,जयसिंग वाकचौरे,वाळूंज शंशीकांत, हारीदास मदने,धनंजय खंडागळे तसेच पक्षाचे तालुका व जिल्हा अधिकारी,पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button