(राजुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन)

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

सावित्रीबाई पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती पर विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच राजुरी येथे १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आलेले आहे.

या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी,मुंबई पोर्ट ट्रस्ट चे निवृत्त अधिकारी बबनराव हाडवळे,ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्ष हाडवळे,विशाल ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील औटी,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप घंगाळे,माजी अध्यक्ष संदीप औटी,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर,शाकीरभाई चौगुले,गणेश हाडवळे, महेंद्र हाडवळे,पांडू दादा कोरडे,सुरेश औटी,उंचखडक गावचे माजी उपसरपंच दत्तू नाना कणसे,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मेडिएटर अशोक भोर,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.बसवराज हातपक्की, डॉ. संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेले कार्य गावच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल.खेडी आणि ग्रामविकासासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे.शिबिरामार्फत होणाऱ्या विधायक उपक्रमांसाठी गाव सर्वतोपरी मदत करेल असे सरपंच प्रिया हाडवळे म्हणाल्या.बबन हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाणी आणि नाणी जपून वापरा तसेच सोशल मीडियाचा मर्यादित वापर करून विद्यार्थी दशेत जीवनाची दशा होऊ न देता योग्य दिशेने वाटचाल करावी असा मोलाचा सल्ला दिला.ग्राहक पंचायत चे बाळासाहेब हाडवळे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून समृद्ध भारत घडवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

शिबिर कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती यावेळी वल्लभ शेळके सरांनी उपस्थितांना दिली.त्यामध्ये युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास,ग्राम सर्व्हे,स्त्री भ्रूण हत्या,रस्ता सुरक्षा अभियान,जलसंवर्धन,पर्यावरण संरक्षण,महिला सक्षमीकरण,वनराई बंधारा, अंधश्रद्धा निर्मूलन पर जनजागृती कार्यक्रम,योगासने,स्त्री-पुरुष समानता,व्यसनमुक्त भारत,माझी वसुंधरा अभियान, पोस्टर सादरीकरण,स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्थानिक इतिहास लेखन,शालेय स्पर्धा अशा अनेकविध उपक्रमांचा समावेश करण्यात आल्याचे वल्लभ शेळके यांनी सांगितले.

स्वावलंबी शिक्षण हाच खरा या शिबिराचा हेतू आहे.या शिबिरामध्ये विद्यार्थी गावची स्वच्छता,निगा आणि सुधारणेच्या दृष्टीने कटिबद्ध तर राहतील.गाव स्वच्छतेबरोबरच मनामनातील विकार,दुर्गुण,वाईट विचार,आणि सवयीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून मन निरोगी आणि साफ करण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचे प्रा.प्रदीप गाडेकर म्हणाले.या शिबिरामध्ये एकूण २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झालेले होते.हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव, प्रा.भूषण दिघे, प्रा.गणेश बोरचटे प्रा.गौरी भोर प्रा.अश्विनी खटींग, प्रा.सचिन भालेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव यांनी मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button