प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
युवकांनी आभाशी जगात वेळ वाया घालवण्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे,शालेय जीवनात मोबाईलचा वापर कमीत कमी करून नित्यनियमाने व्यायाम व खेळातील सहभाग वाढवावा तसेच आधुनिक जीवनशैलीतील शारीरिक व्याधींपासून दूर राहावे असे प्रतिपादन माजी सैनिक सुभेदार चंद्रशेखर जाधव यांनी केले ते स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आपणा सर्वांचा अभिमान स्व.खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित क्रीडा दिन व भूगोल दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला मराठा रेजिमेंटचे माजी सैनिक नायक सुनील चौधरी,माजी सैनिक हवालदार काळूराम चौधरी,सिग्नल रेजिमेंटचे माजी सैनिक सुनील शेंबडे श्री भैरवनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश क्षीरसागर,उपप्राचार्य सुदाम पिंगळे,पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे,प्रा.काळूराम गव्हाणे,प्रा.रोहिदास चौधरी,प्रा.आनंदा गावडे,क्रीडा विभाग प्रमुख एकनाथ शिवेकर,एकनाथ बगाटे,कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल संघटना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव प्रा जितेंद्रकुमार थिटे,प्रा संदीप गवारी,प्रा.अरुण निकम,प्रा.अतुल लिमगुडे,प्रा.सुनील जाधव,प्रा.किरण रेटवडे,राहुल गायकवाड,प्रा.भरत जाधव,प्रा.गणेश पवार,देवा शेळके,कैलास शिनलकर,प्रा.रेखा पलांडे,प्रा.मोहिनी चौधरी,प्रा.शितल चौधरी,प्रा.विजया धुमाळ,प्रा.कल्पना चौधरी,प्रा.सातकर मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पाबळ पोलीस औट पोस्टचे पोलिस हवालदार गणेश सुतार व पोलीस कॉन्स्टेबल अमोल रासकर यांनी भेट दिली.अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये भूगोल दिन व क्रीडा दिन साजरा करण्यात आला क्रीडा दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा,कबड्डी स्पर्धा,चमचा लिंबू,स्लो सायकलिंग व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रतीक गंगाराम शेळके (इ.१२ शास्त्र) याने प्रथम जयदीप राजेंद्र गायकवाड (इ.११वी कॉमर्स )यांनी द्वितीय तर यशराज संपत सुक्रे (इ.११वी शास्त्र )यांनी तृतीय क्रमांक मिळवला.मुलींमध्ये अमृता संतोष जाधव (इ.११वी कला)हिने प्रथम निकिता भाऊसाहेब जाधव( इ .१०दहावी)द्वितीय तर ऋतुजा राजेंद्र डुंबरे (इ.११वी कला )हिने तृतीय क्रमांक मिळवला कबड्डी स्पर्धेमध्ये मुलांमध्ये इ.११वी शास्त्रच्या विद्यार्थ्यांनी प्रथम तर मुलीमध्ये इ.१२ वी संयुक्त च्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला संगीत खुर्चीमध्ये ऋतुजा डुंबरे इ.११वी कला या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्रा.संतोषराव क्षीरसागर यांनी तर आभार प्रा.रोहिदास चौधरी यांनी मानले.