जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार दिला जातो .यंदाचे पुरस्काराचे चौथे वर्ष आहे.२०२४ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार सोहळा राजा शिवछत्रपती सभागृह जुन्नर,या ठिकाणी रविवार दिनांक १४ जानेवारी २०२४रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते.तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. आशाताई बुचके जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे,दिलीप गांजाळे, अजिंक्य घोलप,जिल्हा उपनिबंधक वैभव पडवळ, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे,गटशिक्षणाधिकारी संचिता अभंग, तहसीलदार शितल सैद,कक्ष अधिकारी विशाल ढोले,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे,शिक्षक नेते राजेंद्र जगताप, शिक्षण विस्तार अधिकारी सुशीला डुंबरे हे उपस्थित होते. यावेळी गुणवंत अधिकारी,गुणवंत शिक्षक व विविध पारितोषिक प्राप्त आदर्श शाळा असे एकूण १०५ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षक संघाचे कार्य उत्तम असून तालुक्यातील शिक्षकांचे काम आदर्शवत आहे या पुरस्कारातून ते प्रेरणा घेऊन निश्चितच अजून चांगल्या प्रकारचे शैक्षणिक काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.आशाताई बुचके यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांचे काम दिशादर्शक असून आज सावित्रीच्या लेकींचा सन्मान केला जात आहे म्हणून समाधान व्यक्त केले व शिक्षक संघाचे कौतुक केले.
जिल्हा उपनिबंधक पुणे जिल्हा मा.वैभव पडवळ सर यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा निवड याबाबत मराठी शाळेचे असलेले योगदान आपल्या मनोगतामधून सांगितले.स्पर्धा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक ठरतात अशी माहिती दिली.बाळासाहेब मारणे जिल्हाध्यक्ष यांनी मनोगता मधून “आम्हाला शिकवू द्या” ही मागणी विधिमंडळामध्ये आमदार साहेबांनी घ्यावी तसेच शिक्षकांचे विविध प्रश्न सरकार दरबारी मांडावेत अशी मागणी केली. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी फोन कॉलद्वारे पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शिक्षक मनोगतामधून श्री रवींद्र पानसरे ,मा.नयना आर्विकर, मा. पाटीलबुवा खामकर यांनी तालुका शिक्षक संघाच्या वतीने आमचा सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मा.खंडेराव ढोबळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी संजय डुंबरे,मंगेश मेहेर, साहेबराव मांडवे मा.विनायक ढोले,पतसंस्थेचे सभापती मा.संतोष पाडेकर व सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक संघाचे अध्यक्ष मा. रमाकांत कवडे व सर्व कार्यकरिणी उपस्थित होते.
यावेळी आदर्श शिक्षक महादू घोलप व शिक्षिका अलका घोलप या दाम्पत्याने उपस्थित सर्व शिक्षकांची भोजन व्यवस्था स्वखर्चाने केली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजया ढोले,ओम श्रीसाईराम प्रतिष्ठान नारायणगाव, सभापती व सर्व संचालक मंडळ पतसंस्था जुन्नर यांनी सहकार्य केले. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन विश्वनाथ नलावडे, अशोक बांगर,वैभव सदाकाळ, राजेंद्र चिलप दीपक मुंढे, पंडित चौगुले , शांताराम डोंगरे, बाळ कडू, विजय नवले, मारूती निर्मळ, मनिषा डोंगरे, सुनिता औटी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडी अध्यक्ष शुभदा गाढवे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस श्री प्रभाकर दिघे व महिला आघाडी कार्याध्यक्ष मा.उज्वला लोहकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार वैशाली कुऱ्हाडे मनीषा डोंगरे यांनी मानले.