जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
आळेफाटा ता.जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल महाराज गडगे यांना संत साहित्याचेअभ्यासक व मुख्य वनसंरक्षक नागपूर रंगनाथ नाईकडे भा.व.से. यांच्या हस्ते ‘स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार २०२४ ‘ प्रदान करुन नुकतेच गौरविण्यात आले. युवकमित्र परिवार,पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पत्रकार भवन येथे आयोजित पाचव्या राज्यस्तरीय युवा संमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा बुक क्लब संस्थापक अविनाश निमसे, राजेंद्र खराडे, मंथन फाउंडेशन संस्थापिका आशा भट्ट, मंगलाताई नागुल, प्रल्हाद महाराज डांगे, युवकमित्र परिवार संस्थापक प्रविण महाजन, सचिन म्हसे, प्रा.डाॅ. सुनिल धनगर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते,लेखक रंगनाथ नाईकडे यांनी व्यक्त केले.
विशाल महाराज गडगे यांना श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची व आध्यात्मिक, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेवून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विशाल महाराज गडगे यांचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, गोमाता पतसंस्था अध्यक्ष सुरेशशेठ गडगे, अशोक गडगे, श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, अनुराधा गडगे, जुन्नर तालुका अध्यक्ष संजय शिंदे, डॉ.पुष्पलता शिंदे, यशोदीप पब्लिकेशन्स प्रकाशक निखिल लंभाते, रुपाली अवचारे, प्रा.विजय लोंढे, साहित्यिक संदिप वाघोले, संतोष गडगे, वासुदेव जंबूकर,भाऊसाहेब मेहेर यांनी अभिनंदन केले.