शिरूर प्रतिनिधी – शकील मनियार
लहान पणापासुन कुटुंबातील सर्वांनीच “जॉनी” नावाच्या पाळीव कुञ्यावर मनापासुन प्रेम करून जिव लावला परंन्तु त्याचा दुर्दैवी मुत्यृ बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होईल असे वाटले नव्हते अशी खंत निर्वी गावातील शहाणे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
हि घटना काल दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी मध्यराञी निर्वी ते न्हावरा या मार्गावरील मा.ग्रा.पं सदस्य दिपकराव शहाणे यांच्या शेतातील वस्तीवर घडली.शहाणे कुटुंब हे राञी झोपेतच असताना मध्यराञी अचानक बिबट्या वस्तीवर आला व त्याने शहाणे कुटुंबाचा पाळीव कुञा जॉनीवर बेडर हल्ला चडवत त्याला चितपत करून जागीच ठार केले आहे.ही संपुर्ण घटना शहाणे कुटुंबियांना झोपेतुन उठल्यानंतर सकाळी लक्षात आली.आज बिबट्याने कुञ्यावर हल्ला केला तोच हल्ला माणसांवर केला तर? माणसे देखील मरतील?व ठार होतील? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.या घटने संदर्भात वनविभागाने वेळीच दखल घेणे गरजेचे असुन परिसरात पिंजरा लावण्याची मागणी निर्वी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.
या घटने संदर्भात निर्वी गावासह व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन राञी घराबाहेर निघावे का नाही?असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.निर्वी ते न्हावरा या महामार्गावर दिवसभर नागरिकांची,शालेय विद्यार्थ्यांची दिवसभर रहदारी सुरू असते.त्यामुळे राञी बाहेर निघणारा बिबट्या हा दिवसाही बाहेर निघु शकतो असा सवाल नागरिक करत आहेत.याआधी बिबट्याने सोनवणे वस्ती परिसरातील शेळ्या,मेंढ्या,पाळीव कुञे,जनावरे आदि प्राण्यांवर हल्ला चढवत जखमी केले आहे.त्यामुळे नागिरकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने त्वरीत या परिसरात तातडीने पिंजरा लावुन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी श्रीपाद उद्योग व श्रीपाद ज्वेलर्सच्या संचालिका,विद्यमान ग्रामपंचायत सदस्या ,शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री बुऱ्हाडे,श्रीपाद ज्वेलर्सचे संचालक कमलेश बुऱ्हाडे,मा.ग्रा.पं.सदस्य दिपकराव शहाणे व ग्रामस्थांनी केली आहे.