गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
गोलेगाव येथील कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने किल्ले रायगड सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके व हिंगोली डी.वाय.एस.पी अनिल कटके यांच्या सहकार्याने गोलेगाव येथील दोनशे जणांना मोफत रायगड किल्ला सहलीचे दर्शन करण्यात आले .
शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथील १५५ महिला व ४५ युवक अशा २०० जणांना नुकतेच रायगड किल्ला दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीसाठी पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके व हिंगोली येथील डी.वाय.एस.पी अनिल कटके यांच्या वतीने पिण्याचे पाणी. बस सेवा.सकाळी नाश्ता.आणि भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.सोबत दोनशे जणांना टी शर्ट.टोपी देण्यात आली.अशा सर्व सहलीचे सहकार्य करण्यात आले होते. गोलेगाव याठिकाणी रात्री १० वाजता डी.वाय.एस.पी अनिल कटके यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाघोली याठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. किल्ले रायगड याठिकाणी दुर्गा अभ्यासक मोहन फराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा व पूर्ण इतिहास सांगितला.यावेळी डी.वाय.एस.पी अनिल कटके गोलेगाव सरपंच सुनिता वाखारे.उपसरपंच निलेश बांदल.प्रभाकर पाडळे.शरद पवार कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळाचे सदस्य गोलेगाव महिलावर्ग व युवक उपस्थित होते.