.(स्थानिक वाहनमालकांशी सतत हुज्जत.)
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
नगर-कल्याण महामार्गावरील डुंबरवाडी ता:- जुन्नर येथील टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार होणाऱ्या दादागिरी आणि मुजोर भाषाशैलीला वाहनचालक त्रासले आहेत.त्यामुळे तत्काळ हा टोलनाका बंद करावा;अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा जुन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिला आहे.या संदर्भातील निवेदन मनसे जुन्नर तालुकाध्यक्ष तानाजी तांबे यांनी ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांना दिले आहे.
सुरुवातीपासूनच डुंबरवाडी ता:- जुन्नर येथील टोलनाका वादग्रस्त ठरला आहे.येथील कर्मचारी वर्गाकडून वारंवार होणाऱ्या दादागिरीला आणि मुजोर भाषाशैलीला वाहनचालक त्रासले आहेत.या मार्गावरील दोन टोलनाक्यांमधील अंतरमर्यादा कमी असल्याने हा टोलनाका या ठिकाणी नकोच अशी सुरुवातीला मागणी होती. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी टोलनाका बंद करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या टोलबाबत व कर्मचाऱ्यांच्या दादागिरीबाबत वाहनचालकांसह स्थानिकांमध्ये तीव्र संताप असून हा टोलनाका तत्काळ बंद करावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आले आहे.
[ वाहन घरीच उभे असते, या मार्गावर वाहनाने कोणताही प्रवास केला नाही;तरीही वाहनमालकांच्या फास्टॅग खात्यातून टोलचे पैसे कापले जात आहेत. पैसे कापल्याचे मॅसेज मोबाईलवर येत आहेत. याबाबत टोलनाक्यावर चौकशी केली असता माहितीदिली जात नाही. उलट वाहनमालकांना दादागिरीची भाषा वापरली जात आहे.
एकट्या वाहनचालकासमोर ड्रेसकोड वओळखपत्र नसलेले ४ ते ५ जण अचानक गोळा होत दमदाटी करत अंगावर धावून जात आहेत. अनेकदा वाहनामध्ये कुटुंबीय असल्याने वाहनमालक नाईलाजाने तेथून निघून जात आहेत.टोलनाक्यावर प्रवासी महिला व लहान मुलांची सुरक्षितताधोक्यात आली आहे.त्यामुळे हा टोलनाका हा दादा भाईंचा अड्डा आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. :–स्थानिकांनाही सवलत मिळेन–:स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी असताना तसेच वाहनांची सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही वाहनमालकांच्या फास्टॅग खात्यातून टोल आकारणी केली जात आहे.टोल पास करून वाहन १ ते २ किलोमीटर पुढे गेल्यावर हा टोल आकारला जात आहे
:–मीच मालक अन् मीच व्यवस्थापक–:वाहनचालकाने टोलच्या व्यवस्थापकाचे नाव विचारले असता अथवा संपर्क क्रमांक मागितला असता टोलनाक्याचा रुग्णवाहिका चालक दमबाजीच्या सुरात म्हणतो की,मीच व्यवस्थापक व मीच मालक आहे, बोला काय म्हणणे आहे.तसेच एक खासगी रुग्णवाहिका २४ तास टोल नाक्यावर उभी असून मार्गावर अपघात घडल्यास टोलनाक्याची मोफत सुविधा देणारी रुग्णवाहिका अपघातस्थळी न पाठवता ही खासगी रुग्णवाहिका अपघातस्थळी जात असून वारेमाप पैसे उकळले जात असल्याची चर्चा परिसरात आहे.
:–सूचना फलक व लेनचा अभाव–: टोलनाक्यावर स्थानिकांसाठीच्या नियमावलीचा सूचनाफलक लावण्यात आलेला नाही. कोणत्या पद्धतीने टोल आकारणी केली व इतर त्याबाबतचा कोणताही फलक लावलेला नाही.अरेरावी म्हणजेच सूचना असे येथील सूत्र बनले आहे.तसेच दुचाकींसाठीची लेन व्यवस्था अपूर्ण असून टोलच्या हद्दीत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.त्यामुळे नेमक्या कोणत्या सुविधेचा टोल भरायचा? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.