जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
१जानेवारी २०२४ पासून जुन्नर तालुक्यासह संपूर्ण राज्यातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संपपुकारण्यात आला आहे.विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे.सोमवार दिनांक १ जाने– २०२४ या दिवशी जुन्नर तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदार रविंद्र सबनीस यांना निवेदन देण्यातआले बंदमध्येअखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघहीसंपावर जाणार आहे.
त्यामुळे जुन्नर पुणे आणि महाराष्ट्रातील रेशन दुकानदार १ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत.केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या प्रलंबित न्याय मागण्यांबाबत उदासीन असल्याची टीका महासंघाने केली.सरकारने आंदोलन,मोर्चे याकडे लक्ष दिले नाही. महासंघाच्या विधानाची दखल घेत सरकारने हिवाळी अधिवेशनात नागपुरात सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेतली.केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाने म्हटले आहे.शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.त्यामुळे ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने १Gजानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे.राज्यातील सर्व स्वस्त माल दुकानदारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. :– काय आहेत मागण्या-:• रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा• मार्जिन मनी ३०० रुपये करा• टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या• कालबाह्य नियम बदला• आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ,तूरडाळ,मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा,
यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय रास्त भाव दुकान डीलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत संपात आता ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनही सहभागी झाले आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून राज्यातील सर्व रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.रेशन दुकानदारांच्या मार्जिन उत्पन्नाची हमी ५० हजार रुपये, टूजी ऐवजी फोरजी मशीन,जुन्या नियमात बदल आदी मागण्या घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील रेशन दुकानदार संपावर जाणार असल्याचे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी व जुन्नर तालुकाध्यक्ष सुनिल गुंजाळ यांनी सांगितले.
यावेळी जुन्नर तालुका रेशन संघटनेचे माजी अध्यक्ष मोहन दुबे,विद्यमान उपाध्यक्ष मोहन वल्व्हणकर,सुजाता डोंगरे,कार्याध्यक्ष बबन पानसरे,संजय ढोबळे,दत्ता चासकर, विठ्ठल कवटे,मनोहर डुंबरे,योगेश खोंड,पोपट राक्षे,दिलीप दीक्षित, पोपट चव्हाण, जयंतीलाल सुराणा,इम्रान आत्तार,शांताराम कर्डीले,जयानंद नवले,सुधीर वाव्हळ,मीना मोरे,लता मंडलिक,कल्पना तळपे,विद्या मिरगुंडे,वैशाली औटी,संतोष कवडे,किशोर काकडे,नथु झाडे,नावजी ढेंगळे,भाऊसाहेब भांबेरे,बाबुराव काळे,गणेश दहितुले, बोरा यांनी मोर्चाचे सारथ्य केले.