जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे आणि प्रिमीयम सीरम अँण्ड व्हॅक्सिन प्राइवेट लिमिटेड तसेच लॅब इंडिया अनालिटीकल इंस्ट्रुमेंटस् प्राइवेट लिमिटेड या मध्ये पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.या सामंजस्य करारा अंतर्गत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट प्रिमियम सिरम अँण्ड व्हॅक्सिन प्राइवेट लिमिटेड,नारायणगाव येथे देण्यात आली. कंपनीचे जनरल मॅनेजर डॉ.नितीन साळवी यांनी विद्यार्थ्यांना अँटीसेरा संदर्भात मार्गदर्शन केले.मानव संसाधन युनीटचे मोरे यांनी कंपनीची माहिती विध्यार्थ्यांना दिली.समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी याऔद्योगिक भेटीत आपला सहभाग नोंदवला.लॅब इंडिया अनालिटीकल इंस्ट्रुमेंटस् प्राइवेट लिमिटेड, पुणेच्या विक्रीकर अधिकारी धनंजय कावळे विविध अनालिटीकल इंस्ट्रुमेंटस् चे प्रशिक्षण विध्यार्थ्यांना दिले.आनंद पाटील अनालिटीकल इंस्ट्रुमेंटस् चे महत्व विध्यार्थ्यांना पटवून दिले.
या सामंजस्य करारा अंर्तगत एक दिवसाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.या वेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा.डॉ.बिपीन गांधी,प्रा.मंगेश होले,प्रा.सुजित तांबे,प्रा.दिप्ती थोरात,प्रा.प्रिती पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.सुत्रसंचालन प्रा.अजय भागवत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.बिपीन गांधी यांनी मानले.