गोलेगाव प्रतिनिधी -चेतन पडवळ
गोलेगाव ता.३० गोलेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच ओ.) हे पद गेल्या अकरा महिन्यांपासून रिक्त असून शिरूर आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
शिरूर तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे गोलेगाव येथील शासकीय आरोग्य उपकेंद्रात गेल्या अकरा महिन्यांपासून समुदाय आरोग्य अधिकारी(सी.एच.ओ) गैरहजर असल्याने काही महिन्यांपासून याठिकाणी आरोग्य सेविका कारभार पाहतात. औषधांचा तुटवडा.भिंतीवरील खिडकीच्या काचा फुटलेल्या अवस्थेत असून शासकिय अनेक योजनेपासून परिसरात नागरिक वंचित व अज्ञात आहे.रूग्णानां कोणतीही शासकिय योजनांची माहिती दिली जात नाही.कोणत्याही प्रकारचे योजना राबविण्यात येत नाही. ओ.पी.डी केव्हा चालू केव्हा बंद हेही ग्रामस्थांना माहित नसते.अशी अवस्था सध्या उपकेंद्राची आहे.
या उपकेंद्रात अनेक समस्या असून पुरेशी सामुग्री ही नाही. याबाबत शिरूर आरोग्य अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी याबाबत शिरूर आरोग्य अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
[गोलेगाव येथील आरोग्य उपकेंद्र इमारत व आरोग्य उपकेंद्रातील कोणी अज्ञात व्यक्तीने खिडकीची फोडलेली काच] .
[ आपण गोलेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य हे पद फेब्रुवारी पासून रिक्त आहे.
याठिकाणी तत्काळ पद नवीन नेमणूक व्हावी.असे पत्र जिल्हा परिषद आरोग्य विभागास लेखी मागणी केली आहे.]
( डॉ. मोरे शिरूर तालुका आरोग्य अधिकारी )