जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान ओतूर यांच्या वतीने ओतूर आणि परिसरातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेत उत्तम यश मिळविण्यासाठी व जगणे समृद्ध करणारे विशेष व्याख्यान *परीक्षेला जाता जाता* या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते,साहित्यिक संजय गवांदे यांचे ओतूर येथील अवचट सभागृहात आयोजित करण्यात आले होते.संजय गवांदे यांची बोलण्याची धाटणी,मार्मिक उदाहरणे,कविता,आणी त्यांचं वक्तृत्व यामुळे संपूर्ण व्याख्यान मंत्रमुग्ध करणारे झाले.
उत्तर पत्रिका लिहिताना आपले अक्षर अधिक नेटके कसे असू शकेल,यासाठीचा युक्त्या गवांदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या.आपली उत्तर पत्रिका नटवी नसावी,परंतु नेटकी असावी. यासाठी कशा पद्धतीने उत्तर पत्रिका सुंदर हस्ताक्षरात लिहिली पाहिजे या गोष्टीही त्यांनी मुलांना समजून सांगितल्या.तणावमुक्त् वातावरण ठेवण्यासाठी काय काय केल पाहिजे याचे त्यांनी विविध दाखले देऊन ते मुलांच्या काळजापर्यंत पोहोचवले.
सूंदरता ही कामाची शोभा नाही तर गाभा आहे हे सांगताना,पाठ्य पुस्तकातील अभ्यास म्हणजे अभ्यास नाही तर,जीवनाचा असंख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने या वयात समर्थ झाले पाहिजे.चांगली पुस्तक,चांगले मित्र आणि चांगले समूह यांचा सानिध्यात घडलं,वाढलं पाहिजे.आपल्या प्रत्येकाचा आई वडिलांचा मनोदय असतो,आपल्या मुलांची सावली मोठी पडावी,यासाठी आपण कर्तृत्वान होण अत्यंत गरजेच आहे.त्यासाठी मुलांच्या हातातील मोबाईल सोडून आपली अभ्यासक्रमातील पुस्तके घेतली पाहिजे.स्पर्धेचा युगामध्ये स्पर्धा निकोप असली पाहिजे.आळसाला झटकून रात्रदिवस आपण ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केल तरच आपले भविष्य उज्ज्वल आहे. ज्या शिवभूमीमध्ये आपण जन्माला आलो,त्या मातीचे ऋण फेडायचे असेल तर आपण समर्थपणे उभे राहून समर्थ भारताचे नेतृत्व करायला शिकले पाहिजे.आपली माती अपमाणित होणार नाही.अशा पद्धतीने कर्म प्रत्येक विद्यार्थ्यांनी कराव अस त्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितलं.या व्याख्यानासाठी चैतन्य विद्यालय,श्री गाडगे महाराज विद्यालय,सावित्रीबाई फुले विद्यालय,शिवनेरी विद्यालय या शाळामधील ५०० विद्यार्थी,पालक तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ छाया तांबे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,गाडगे महाराज शाळेचे संचालक नितीन पाटील,उपसरपंच प्रशांत डुंबरे,धनंजय डुंबरे,डॉ.रश्मि घोलप,संतोष वाळेकर तसेंच स्व.वैभवदादा देशमुख प्रतिष्ठानचे श्रीमती मेघना देशमुख,रोहिदास डुंबरे व सर्व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित डांगे यांनी प्रास्तविक पोपट नलावडे,सत्कार शोभा तांबे यांनी केले.तर आभार प्रदर्शन शरद माळवे यांनी केले.