शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर रोजी जि. प. प्राथमीक शाळा बुरुजवाडी शालेय व्यवस्थापन समितीची सन २०२३ ते २०२५ साठी बिनविरोध निवड करण्यात आली असूनअध्यक्षपदी. रोशन मोहन रुकेउपाध्यक्षपदी. काळुराम बबन उमाप यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.तसेच सदस्य पदीराहुल नळकांडे, प्रवीण गावडे, सागर नळकांडे, भाऊसाहेब नळकांडे,अनिता टेमगिरे, वृंदा माने, स्नेहल पांगारे, राजश्री पवार, सीमा टेमगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीया शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी सर्व पालक ग्रामस्थ तसेच शिक्षक स्टाफ, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत पदाधिकारी, वि.वि.का.का. सोसायटी सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरुंजवाडी शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेसमाजी अध्यक्ष प्रवीण टेमगिरे, माजी अध्यक्ष गणेश रुके व माजी उपाध्यक्ष दीपक सासवडे, नवनियुक्त अध्यक्ष रोशन रुके, उपाध्यक्ष काळूराम उमाप व सर्व सदस्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीस माजी उपसरपंच विलास नाना नळकांडे,सरपंच नानासाहेब रुके,चेअरमन विजयराव टेमगिरे,प्रदेशाध्यक्ष शरद टेमगिरे यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.