(उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय कोकणे यांनी स्वीकारले निवेदन)
जुन्नर प्रतिनिधी :-रविंद्र भोर
कुकडी पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी दरामध्ये सहापटीने दरवाढ केली असून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या बिलातून ही वाढीव पाणीपट्टीची रक्कम कपात न करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला असून कारखाना ही कपात करणार नाही अशी माहिती श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
कुकडी पाटबंधारे विभागाने दरवर्षीप्रमाणे पाणीपट्टीची रक्कम ऊस उत्पादकांच्या ऊस बिलातून कपात करुन मिळणेबाबत कारखान्यास कळविले आहे मात्र मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी दरामध्ये वाढ करुन सदर पाणीपट्टीची वसूली कारखान्यामार्फत ऊस बिलातून करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड विरोध असल्याने वाढीव दराने आकारलेल्या पाणीपट्टीची वसूली शेतक- यांच्या ऊस बिलातून केली जाणार नाही याबाबतचेनिवेदन अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या उपस्थितीत कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय कोकणे यांना दिले असल्याची माहितीदेखील अध्यक्ष श्री शेरकर यांनी दिली.याशिवाय मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंद पाटे व जुन्नर तालुका अध्यक्ष तानाजी तांबे यांनी पाणीपट्टी कपाती विरोधातआंदोलनचा इशारा दिला होता.
कुकडी पाटबंधारे विभागास श्री शेरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यापुर्वी ऊस उत्पादकांचे संमतीपत्रानुसार विघ्नहर कारखाना पाटबंधारे विभागाने कळविलेल्या वसूली यादीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस बिलातून रक्कम कपात करुन सदरची रक्कम विघ्नहरने वेळोवेळी शासनास अदा केली आहे. परंतू या वर्षीचे हंगामा– पासून पाटबंधारे विभागाने पाणीपट्टीच्या दरामध्ये केलेल्या भरमसाठ वाढीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.शेतीच्या खचर्चामध्ये होत असलेली भरमसाठ वाढ तसेच कांदा निर्यात शुल्कामध्ये केलेली वाढ व निर्यातबंदी, सोयाबिनची आयात, साखर निर्यात बंदी.
या सर्व बाबींमुळे शेतकऱ्यांच्या वार्षिकउत्पन्नामध्ये आधीच खूप घट झाली आहे.त्यामध्ये पाणीपट्टी दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटील आला आहे.या सर्व बाबींचा विचार करुन विघ्नहर कारखाना वाढीव पाणीपट्टी दरवाढीनुसार शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपाट करण्यात येणार नसल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.तसेच शासनाकडून जुन्या दराप्रमाणे पाणीपट्टी वसूलीची यादी विघ्नहर कारखान्यास आल्यास त्याप्रमाणे ऊस उत्पादकांच ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम वसूली करणेस कारखाना सहकार्य करील असेही चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितले.