शुभम वाकचौरे
शिरूर येथे येशू जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या येशू जन्मोत्सवा चे आयोजन येशू जन्मोत्सव समिती शिरूर तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते.येशू जन्मोत्सवा मध्ये प्रथम स्तुती, आराधना व त्यानंतर मान्यवरांचे शाल व गुलाब देवून सन्मान करण्यात आले. व त्यानंतर सर्व शिरूर तालुक्यातील पाळकांचे सन्मान चिन्हं देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व शिरूर तालुक्यातील टीम लीडर चा गुलाब देवून सन्मान करण्यात आला.
येशू जन्मोत्सवा निमित्त सर्वासाठी प्रार्थना करण्यात आली. व त्यानंतर देवाच्या वचना द्वारे सर्वांना बोध करण्यात आला. यावेळी देवाचे दास पा. पौल बोलत होते. येशू ख्रिस्त हा जात,धर्म बदलण्यासाठी आला नाही. तर जीवन बदलण्यासाठी आला आहे. देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. येशू ख्रिस्त हा शांती देण्यासाठी या जगात आला आहे.या वचनातून सर्व मंडळीला संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.पॉल दास , आमदार अशोक बापू पवार, पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब ,भाजपा शहर अध्यक्ष नितीन दादा पाचरणे, लोकशाही क्रांती आघाडीचे रवींद्र धनक, डॉ मगण ससाणे,बिजवांत काका शिंदे ,माजी नगरसेवक विनोद भालेराव , नगरसेवक मंगेश खांडरे ,राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर शहराध्यक्ष मुजफ्फर भाई कुरेशी, प्रदीप काँग्रेस पक्षाच्या शिरूर तालुका महिला अध्यक्ष संगीता शेवाळे ,हाफिस भाई बागवान, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष राजुद्दीन भाई सय्यद, बहुजन पालक संघाचे महाराष्ट्र राज्य संयोजक नाथाभाऊ पाचर्णे ,बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोज भाई सय्यद, सागर घोलप, गौरव रावडे ,चेतन साठे, विशाल जोगदंड अमोल पठारे, कांग्रेस पक्षाचे नगर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत उजागरे ,प्रमोद गायकवाड, वैभव महाराज जोशी, योगेश महाजन कांबळे सर शिरूर शहर येशू जन्मोत्सव समिती विपुल राऊत, मधुकर सेनानी,अरुण रणदिवे ,फ्रान्सिस मनकाळे, अजिंक्य सूर्यवंशी, तुषार कांबळे, संतोष गोरखे बापू रणदिवे, विनोद चोथमल, देवीसिंग चव्हाण., व शिरूर शहरातील इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.