गोलेगाव प्रतिनिधी- चेतन पडवळ
गोलेगाव ता.२० गोलेगाव येथील शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची गावठाण परिसरातून झांज ढोल ताशा गजरात मिरवणूक काढण्यात आली. नुकतेच पुणे मॉडर्न पेंटालेथोन स्पर्धेत घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावर गोलेगाव येथील शिवाजी विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश संपादन केले.यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्काराचे आयोजन शिरूर तालुका एकलव्य संघटना. ग्रामपंचायत तरडोबाचीवाडी व शिवाजी विद्यालय गोलेगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. गोलेगाव सरपंच सुनिता वाखारे. संस्थेचे सचिव संजय वाखारे तरडोबाचीवाडी सरपंच जगदिश पाचर्णे उपसरपंच अमोल देवकाते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक मच्छिंद्र गायकवाड यांना शाल व श्रीफळ देऊन फेटे बांधून यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास शिरूर तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष शरद दुर्गे. आदर्श शिक्षक दैवदैठण संदिप घावटे .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रावसाहेब दरेकर. बाळासाहेब गायकवाड. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलेगाव मुख्याध्यापक संदिप आढाव. शिवाजी विद्यालय संस्थेचे सचिव संजय वाखारे. संचालक कानिफनाथ गिरमकर सरपंच सुनिता वाखारे. माजी सरपंच दिलीप पडवळ. माजी सरपंच रामभाऊ वाखारे. माजी सैनिक जगन्नाथ कटके तरडोबाचीवाडी सरपंच जगदिश पाचर्णे. उपसरपंच अमोल देवकाते. तेजस्विनी फाऊंडेशन अध्यक्ष वैशाली चव्हाण. सदस्य संदिप पवार. एकलव्य संघटना अध्यक्ष पप्पू निकम. व सहकारी तसेच शिवाजी विद्यालयातील शिक्षकवर्ग उपस्थित होते. महाराष्ट्र शासन अंतर्गत पुणेे याठिकाणी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेेल्या क्रीडास्पर्धा वैयक्तिक क्रीडाप्रकार मॉडर्न पेंटालेथोन क्रीडाप्रकारमध्ये विभागीय स्तरावर क्रिडा स्पर्धेत गोलेगाव येथील शिवाजी विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला. याा विद्यार्थ्यांना मच्छिंद्र गायकवाड यांनी मार्गदर्शन केले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून स्पर्धेक आले होते.
शुभम विठ्ठल पवार इ.10 वी या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय प्रथम व विभाग द्वितीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय पातळीवर या विद्यार्थ्यांची अमरावती याठिकाणी होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे. क्रीडास्पर्धेत द्वितीय क्रमांक अपेक्षा भाऊ जाधव द्वितीय क्रमांक कृष्णा नरेश थेऊरकर. तृतीय क्रमांक संदेश बबन रसाळ या विद्यार्थ्यांनीही स्पर्धेत सहभागी होऊन यश प्राप्त केले.