६० जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
मोतीबिंदू मुक्त जुन्नर तालुका अभियानांतर्गत डिसेंट फाउंडेशन व सारथ्य फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व आर झुणझुणवाला आय शंकरा हॉस्पिटल पनवेल मुंबई यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन पुरुष जेष्ठ नागरिक संघ व मुक्ताई महिला नागरिक संघ यांच्या सहकार्याने ओतूर येथे करण्यात आले होते.यावेळी नागरिकांनी या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद दिला.या शिबिरात एकूण २३४ महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली असून ६० जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील आय शंकरा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव,फकीर आतार,सरपंच छाया तांबे,उपसरपंच प्रशांत डुंबरे,हॉस्पिटलचे प्रतिनिधी प्रकाश पाटील,शिरीष डुंबरे,अवधूत शिंगोटे, प्रमोद बोडके,अक्षय गावडे,सागर गाढवे,प्रवीण पवार, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर व सर्व संचालक , मुक्ताई महिला संघाच्या अध्यक्षा सुनंदा डुंबरे व सर्व संचालिका यांनी प्रयत्न केले.