जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर तालुक्यातील निसर्गसंपन्न अतीदुर्गम आदिवासी भागातील कोपरे परिसर,तसेच रांजण बुरूज तसेच डामसेवाडी परिसरात गारमाळ येथे घंटेसारखा खणखण ब्रम्हनाद निर्माण करणारे आवाज येणाऱ्या काही शिळा आढळून आल्या असल्याचे पर्यटक,मार्गदर्शक पुताजी ऊर्फ बाळा डामसे यांनी सांगितले.यापूर्वी याच सह्याद्री पर्वत रांगेतील आंबेहातविज येथील दुर्गाबाई किल्ले परिसरात पखवाजा चा नाद निर्माण करणारे दगड आढळून आले आहेत. येथील माळरान दगडमाळ आहे.येथे दगड इतस्ततः विखुरले आहेत.या अनेक दगडांत असलेले काही दगड मात्र अद्भुत आवाजाचे असून,येथील काही दगडांवर दुसऱ्या कोणत्याही दगड अथवा लोखंडी वस्तूने मारल्यास नादब्रम्ह घंटेसारखा मंजुळ तरंग आणि खणखणीत आवाज येतो.रांजणबुरुजाजवळील एक शिळा व डामसेवाडी परिसरात तीन ते चार शिळा आपल्याला आढळून आल्या असून, त्यांच्यामधून खणखण असा आवाज येतो.या दगडांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असावे.यामुळे हा आवाज येत असल्याचे डामसे यांनी सांगितले.

पर्यटकांनी या वाजणाऱ्या दगडांना भेट देण्यासाठी अवश्य यावे. मात्र, या दगडांची नासधूस करू नये.वन विभागाने या दगडांचे संवर्धन करावे. विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कारिक असणाऱ्या या दगडांवर संशोधन करण्याची मागणी होत आहे. या ठिकाणचे दगड हे कदाचित उल्कापात, भूगर्भातील खनिजे किंवा लाव्हारसापासून बनलेले असावेत, असे डामसे यांनी सांगितले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button