प्रतिनिधी : एकनाथ थोरात
श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी ( ता . शिरूर ) जि . पुणे येथे दिनांक 19 ते 20 यादरम्यान शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न होणार असल्याची माहिती मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ , ज्येष्ठ लिपिक विठ्ठलराव गवारी व विज्ञान शिक्षक प्रभाकर चांदगुडे यांनी दिली .
श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी (ता .शिरूर ) जिल्हा पुणे येथे दिनांक 19 व 20 मंगळवार व बुधवार रोजी ५१ वे शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न होणार आहे .पुणे जिल्हा परिषद ,शिरूर पंचायत समिती , शिरूर तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघ आणि श्री पांडुरंग विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन संपन्न होत आहे .
या प्रदर्शनामध्ये शिरूर तालुक्यातील इ . .पहिली ते पाचवी , इ . सहावी ते आठवी इ . नववी ते बारावी यासह प्राथमिक शिक्षक ,माध्यमिक शिक्षक व प्रयोगशाळा परिचर असे सहा गट सहभागी होणार आहेत . या वेळी विविध विषयावर किमान 200 प्रकल्प सादर केले जातील असा अंदाज आहे .विज्ञान प्रदर्शनाबरोबरच प्रश्नमंजुषा ,वक्तृत्व कला या स्पर्धा सुद्धा संपन्न होणार आहेत .
मंगळवार दिनांक 19 रोजी सकाळी दहा वाजता माजी आमदार सूर्यकांत पलांडे ,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे , शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके , गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे .
तर बुधवार दिनांक 19 रोजी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण ,माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे , प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड , गट शिक्षण अधिकारी अनिल बाबर ,शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर , वंदना शिंदे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती आण्णा गवारी उपाध्यक्ष ल व्हाजी लोखंडे ,सचिव पंडित हरिश्चंद्र गवारे ,सरपंच शंकरराव धुळे , शिरूर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी ठुबे , शिरूर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष कल्याण कडेकर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे .
हे प्रदर्शन भव्य दिव्य आणि अभुतपूर्व होण्यासाठी विद्यालयाने जंगी तयारी केली आहे .कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्रांगणात दहा हजार स्क्वेअर फुट मापाचा भव्य असा मंडप टाकला आहे . याशिवाय प्रयोगाच्या मांडणीं साठी चार प्रशस्त हॉलची व्यवस्था करून त्यात दीडशे टेबलची रचना केलेली आहे .याशिवाय मोकळ्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खास कक्ष तयार केलेला आहे .पार्किंग साठी खास व्यवस्था व बाहेरून येणार्या विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी नाश्ता , चहापाणी , भोजन , मुक्काम यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे .
या छोट्याशा विद्यालयात प्रथमच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न होत असल्याने , हे विज्ञान प्रदर्शन सर्वोत्तम व्हावे यासाठी संस्थंचे अध्यक्ष निवृत्ती आण्णा गवारे स्वतः लक्ष देत असुन संस्थेचे सर्व पदाधिकारी , ग्रामस्थ , माजी विद्यार्थी यांनी यासाठी निधी उभा केला आहे .
१)श्री पांडुरंग विद्या मंदिर , विठुलवाडी इमारत .
२) मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ