जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
सागरमाथा संस्थेच्यावतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कै.रमेश गुळवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.यंदा किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.१६ डिसेंबर रोजी किल्ले चावंड येथे शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर, सागर माथा संस्थेच्या विविध सभासदांच्या मदतीने अमोल ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी स्थानिक युवकांसाठी व्यसनमुक्ती आणि करियर गायडन्स बाबत मार्गदर्शक व्याख्यान अरुण बोराडे यांनी दिले.
रविवारी चावंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध शालेय उपयोगी पुस्तके ग्रंथ शाळेस प्रदान करण्यात आले.पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक अरुण बोराडे,इतिहास अभ्यासक तसेच चिंचवडे,डॉ संग्राम इंदोरे, निलेश गावडे,शिवाजी ट्रेलचे विनायक खोत,विस्तार अधिकारी व्ही आर धोंडगे,जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, सरपंच सुमन लांडे,सुरेश जोशी,सुनील शेलकांदे,पंढरीनाथ लांडे,नारद गुळवे,एव्हरेस्ट विर श्रीहरी तापकीर,सागरमाथा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण हरपळे,सुमित दाभाडे,पांडुरंग शिंदे उपस्थित होते.