प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिंव्ह सोसायटीच्याकुर्ला ,सानपाडा ,चेंबूर,आणि विक्रोळी या ४ शाखांच्या पाल्य गुणगौरव समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शा.कृ पंत वालावलकर हायस्कूल कुर्ला येथे विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मोबाईलचा वापर जास्त केल्यानं त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या वाचनावर, तसेच शारीरिक व मानसिक विकासावर झाला प्रसंगी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले .त्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय नजीवनात मोबाईलचा वापर कमी करावा आणि वाचन व लेखन यांचा सराव करावा यातूनच आपणास यश प्राप्त होईल .मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटूंबातील संवाद ,वाद-विवाद, व चर्चा या बाबींचा विसर पडला आहे असे याप्रसंगी पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे सचिव सत्येंद्र सामंत हे होते त्यांनी पतसंस्था राबवत असलेल्या अनेक योजनांचे कौतुक केले आणी नवीन शाखा विस्तार केल्याबद्दल पदाधिकारी व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सहसचिव सतीश माने यांनी सेकंडरी पतसंस्थेचा प्रगतीचा आढावा घेतला या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक महादेव यादव,नरेंद्र शिंदे,सरगर सर,औटी मॅडम,सचिव किशोर पाटील, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,संचालक जगन्नाथ जाधव, भाऊसाहेब आहेर,प्रमोद देशमुख, तुकाराम बेनके,पंकज सिंह,शकिल अन्सारी, जयश्री गव्हाणे, वैशाली बैलोसे प्रभारी सरव्यवस्थापक शांताराम वीरकर माजी संचालक सखाराम डोंगरे, बहुसंख्य सभासद व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे खजिनदार सतेश शिंदे यांनी तर आभार गोविंदराव सूळ यांनी मानले.