जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ग्रंथाली प्रकाशित आणि संजय नलावडे लिखित ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १६ डिसें रोजी नंदलाल लाॅन्स,ओतूर येथे अनेक मान्य वरांच्या उपस्थितीत शिवशाही थाटात संपन्न झाला. ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकात साकारलेल्या शिवजन्मभूमीतील अडतीस व्यक्तिमत्वांना मानवंदना देण्यासाठी ही पुस्तकं पालखीतून मंगलवाद्य आणि तुतारीच्या निनादात मंचावर आणण्यात आली. शिवनेरीभूषण डॉ.सदानंद राऊत,शिवनेरीभूषण विनायक खोत,माजी सैनिक रमेश खरमाळे,किरण कबाडी :-वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाणे,शिवाजी चाळक,शिवांजली साहित्यपीठ अशा अनेक दिग्गजांनी ही पालखी व ‘शिवनेरीची श्रीमंती’ खांद्यावर घेतली आणि खऱ्या अर्थाने आजच्या कर्तृत्ववान पिढीने आधीच्या पिढीतील कर्तृत्ववान मान्यवरांना मानवंदना दिली.याप्रसंगी शिवजन्मभूमीचा उगवता तारा गायक मयुर सुकाळे यांनी पोवाडा सादर केला तेव्हा संपूर्ण वातावरणात चैतन्य संचारले तर छोट्या दुर्गराज खोत याने गारद दिली तेव्हा सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे राहिले. सुरवातीला पाहुण्यांचे औक्षण,गणेशपूजन, दिपप्रज्वलन करून समारंभ सुरू झाला.जगप्रसिद्ध चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांचे अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळांकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केलेल्या ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकातीलच संगीता जोशी,मराठीतील पहिल्या स्त्रीगझलकार, द. स. काकडे,ज्येष्ठ कादंबरीकार,अशोक डुंबरे,दुरदर्शन निर्माते,वसंतराव पोखरकर,उद्योजक,डॉ.प्रकाश खांडगे,लोककला अभ्यासक,भास्कर हांडे,चित्रकार आणि सुदेश हिंगलासपूरकर,विश्वस्त, ग्रंथाली प्रकाशन या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याच्या या युगात मावळतीच्या सूर्याला मुजरा करण्याची प्रेरणा मला शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरीच्या आशिर्वादाने मिळाली’ असे उद्गार लेखक संजय नलावडे यांनी ‘शिवनेरीची श्रीमंती’ या प्रकाशन सोहळ्यात काढले.संजय नलावडे हे मुळचे शिवजन्म- भुमी जुन्नर तालुक्यातील परंतु नोकरी व्यवसाया– निमित्त मुंबईमध्ये ते राहत असले तरी आपल्या जन्मभूमीशी त्यांची नाळ घट्ट रुतलेली आहे. सदर व्यक्तीचित्रणात्मक ग्रंथांमध्ये त्यांनी आपल्याच जुन्नर तालुक्यात जन्माला येऊन ज्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा डोलारा उभारून दीप- स्तंभा प्रमाणे पुढील पिढ्यांना प्रकाशवाटा दाखवल्या अशा महान व्यक्तींची चरित्रात्मक कहाणी वाचकांच्या पुढ्यात ठेवली आहे.
याप्रसंगी नरेंद्र वाबळे,,उद्योगपती विकासजी दांगट,ह.भ.प.गंगारामबुवा डुंबरे,ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर घोडेकर,डॉ.ज्ञानेश्वर थोरात,डॉ.लता पाडेकर, नरेंद्र डुंबरे, ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,सुरेश हांडे,साहित्यिक,कवयित्री रश्मी घोलप, भरत अवचट, ग्रामविकास मंडळ ओतूर अध्यक्षअनिल तांबे,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, देविदास तांबे, बोर्डरलेस पँथर्स चे नंदु भोर,जालंदर उकिर्डे, पोपटराव नलावडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी संजय गवांदे यांनी केले.